ताज्या घडामोडी

पोलीस अधिक्षक कार्यालयात “वीर बाल दिवस साजरा करण्यात आला.

नांदेड:26 डिसेंबर, 2023 मंगळवार रोजी मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड यांचे मार्गदर्शानखाली ‘वीर बाल दिवस साजरा करण्यात आला. मा. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड यांनी वीर बालक बाबा जोरावरसिंहजी व बाबा फतेहसिंहजी यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी श्री श्यामसुंदर टाक, पोनि जिवीशा, शिवाजी लष्करे, सपोनि तथा जनसंपर्क अधिकारी, नांदेड यांचेसह पोलीस अधिक्षक कार्यालयातील सर्व विभागाचे पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन पोहेकों संजय सांगवीकर, पोकों विनोद भंडारे यांनी केले आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.