https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

अज्ञात मेंढी चोरांच्या विरोधात मानवत पो.स्टे. मध्ये भादवी कलम ३७९ गून्हा दाखल.

मेंढ्याचोर सक्रिय झाल्यामूळे मेंढपाळामध्ये भितीचे वातावरण.* *शेतात बसविलेल्या मेंढया चोरीस ; मानवत पोलिसांत अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखलतालुक्यातील सारंगापूर शिवारातील घटना

मानवत / प्रतिनिधी.

शेतात बसवलेल्या मेंढया अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याची घटना मानवत तालुक्यातील मौ. सारंगापूर शिवारात घडली आहे त्यामूळे मेंढपाळा सह शेळीपालक मध्ये भितीचे वातावरण .
सविस्तर माहिती अशी की,
मानवत तालूक्यातील सारंगापूर शिवारातील घटना मेंढपाळ चिमा शामराव हाके वय वर्षे ३९ (रा. ईटोली ता. जिंतूर ) हे मेंढपाळ व्यवसाय करत गावो गावी जाऊन आपली उपजीविका भागवत असतात नित्य नेहमी प्रमाणे त्यांनी मानवत तालुक्यातील मौ. सारंगापूर येथील शेतकरी मुक्तीराम चौकट यांच्या शेतात दिनांक १६ डिसेंबर रोजी आपल्या मेंढया शेतात बसवल्या व रात्री जेवण करून झोपले असता सकाळी उठून पाहिले असता ३७५ मेंढया पैकी १५ मेंढया ह्या त्यातील गायब झाल्या असल्याचे निदर्शनास आले.
सदरील मेंढयाचा शोध त्यांनी आजू बाजू व परिसरात घेतला परंतु कुठे हि मेंढया आढळून आल्या नाही.
तसेच जवळ पास भरत असलेल्या जनावरांच्या बाजारात हि शोध घेतला असता तेथे पण मेंढया आढळून आल्या नाहीत त्यामुळे मेंढपाळ चिमा शामराव हाके यांचे एकूण ६० हजार रुपयाचे मोठे अर्थीक नुकसान झाले असून त्यांच्या फिर्यादी वरून दिनांक २५ डिसेंबर रोजी मानवत पोलिस स्टेशन मध्ये अज्ञात चोरट्या विरुद्ध भा. दं. वि.चे कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचा पुढील तपास मानवत पोलीस स्टेशन चे पोलिस निरिक्षक दिपक दंतूलवार यांच्या मार्गदर्शना खाले करण्यात येत आहेत.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704