https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

सायन्स कॉलेजमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

नांदेड:
सायन्स कॉलेजमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या व वक्ता म्हणून भरोसा सेल नांदेडच्या पोलीस उपनिरीक्षक प्रणिता बाभळे होत्या त्यांनी सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या स्त्री उद्धारक व प्रथम शिक्षिका कशा होत्या व आजच्या विद्यार्थिनींनी त्याचा आदर्श घेऊन आपले व्यक्तिमत्व कसे घडवावे याचे सविस्तर मार्गदर्शन केले. तर दुसरे प्रमुख पाहुणे नांदेड एज्युकेशन सोसायटी नांदेडचे उपाध्यक्ष सीए डॉ .प्रवीण पाटील यांनी जसा फुले दांपत्याच्या शाळेतील विद्यार्थिनी मुक्ता साळवे हिने आमचा धर्म कोणता असा प्रश्न देवाला पत्र लिहून विचारला तसा वेगळा विचार आजच्या विद्यार्थिनींनी व शिक्षिकेने केला पाहिजे असे मत आपल्या मनोगतात व्यक्त केले. यावेळी प्राचार्य डॉ डी यू गवई, उपप्राचार्य डॉ. लक्ष्मण शिंदे, प्रा. ई.एम खिल्हारे,डॉ सौ.अरुणा शुक्ला प्रा. एम.आर .मुळे, प्रो. डॉ. ए.एस. बनसोडे, प्रो डॉ डी आर मुंडे, डॉ ए टी शिंदे, डॉ सौ व्ही व्ही कुलकर्णी, डॉ सौ एस एस मोदी, प्रा. सौ .एम .एच राऊत, प्रा सौ पी एस बोरकर, यांच्यासह प्राध्यापक वद व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704