https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

विद्यासागर हायस्कूल मध्ये *क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालुक्यातील मौ. करंजी येथील विद्यासागर हायस्कूल मध्ये दिनांक ०३ जानेवारी रोजी विद्येची जननी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती *महिला शिक्षण दिन* म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या प्रसंगी विद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. ज्ञानोबा इंगळे यांच्या प्रेरणेतून अनेक विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशात आल्या होत्या. त्या मुळे शालेय परिसर शोभून दिसत होता व उत्साह संचारला होता. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. रमेश वरकड हे होते. तर यावेळी वर्ग *इयत्ता पाचवी* मधून स्मिता चिखले, अनुष्का जाधव, राधिका जाधव, संजना ढगे, शारदा जाधव, संध्या जाधव, गोविंद थोरवट, तसेच वर्ग *इयत्ता सहावी* मधून श्रुतिका जाधव, राधिका जाधव, गायत्री नरवडे, मुंजा पितळे, परमेश्वर डोने, समर्थ जाधव, इयत्ता *इयत्ता सातवी* मधून श्रेया जाधव, ऋतुजा पोंडे, अश्विनी कुरे, पूनम कांबळे, आदित्य पितळे, चैतन्य पितळे, वैदेही निर्मळ आणि *इयत्ता आठवी* मधून किरण निर्मळ, रोशनी निर्मळ, युवराज घायाळ या विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला तर या वेळी अनेकांनी त्यांचे गुण गौरव करणारे गीत आणि पोवाडे गायले तसेच त्यांच्या जीवनावर आधारित विविध कविता सादर केल्या संपूर्ण शालेय परिसर सावित्रीबाईंच्या विचारांनी भारावून गेला होता.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. लक्ष्मण वाघमारे, श्री. लक्ष्मण गाजुलवार, श्री. ग्यानोबा मुरमुरे, श्री. रेणुकादास मुळे, श्री. आनंद असोलेकर, श्री. मधुकर शिंदे यांनी परिश्रम घेतले.
तर यावेळी श्री. ज्ञानोबा इंगळे यांनी “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा'” या अभियाना विषयी विद्यार्थ्यां मध्ये जागृती निर्माण केली व आपला सहभाग देण्यास प्रेरित केले तसेच माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथरावजी शिंदे यांनी विद्यार्थ्यांना लिहिलेल्या पत्रांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर ते पत्र सर्व विद्यार्थ्यांसमोर प्रकट वाचन करण्यात आले आणि त्या नंतर सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या वेळी योग्य उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले शेवटी उपस्थितांचे आभार सांस्कृतिक विभागाच्या वतीने मानण्यात आले. या वेळी कार्यक्रमास शाळेतील विद्यार्थ्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704