https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने पेडगाव येथे संत रविदास महाराज यांच्या मूर्ती स्थापनेच्या कार्यक्रमाचे आयोजन

मानवत / प्रतिनिधी

दिनांक १९/ १२/ २०२३ मंगळवार रोजी पेडगाव येथील समस्त चर्मकार समाज बांधव आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा परभणी यांच्या वतीने श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या मूर्ती स्थापनेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या दिवशी दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून सर्वप्रथम मंगळवारी सकाळी आठ वाजता गुरु रविदास महाराज यांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढून मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे या यानिमित्त कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवरावजी गायकवाड, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे विदर्भ प्रमुख संभा वाकुजी वाघमारे, समाज भूषण सहादू ठोंबरे, कात्रज तिसरे धाम पुणे येथील अमोल महाराज, यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गुरु रविदास महाराज यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे, कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी पेडगाव मंदिर समिती गुरु रविदास महाराज अन्नछत्र परभणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत, या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून परभणी जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी माता भगिनींनी आपापले व्यवसाय एक दिवस बंद ठेवून या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन पेडगाव येथील रविदास मंदिर समिती चे अध्यक्ष तथा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे परभणी तालुका अध्यक्ष विनोद किशनराव असोरे यांनी केले आहे ,

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704