https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

एम सी आर न्यूज कवयित्री आपल्या भेटीला” तू अन् मी ” : लैलेशा भुरे

तू अन् मी

तुझ्या गालावरची खळी
आकाशातील चंद्रमा जस.
आठवण येई त्या रात्रीची
प्रिये मी विसरू कसा?

 

 

 

 

  1. तुझे रूप शीतल चांदणे
    नाक जणू चाफेकळी
    किती वेड लावते जीवाला
    तुझ्या गालावरची खळी

तुझी माझी भेट घडताना
पाऊस मस्त होता पडत
तुझ्या गालावरच्या खळीला
पाहून तोही होता हसत

गो-या तुझ्या गालावरती
केस तुझे सखे रूळती
चंद्रकोर शोभे माथ्यावरती
तू भासे लावण्याची मूर्ती

 

 

कस सांगू गुपित मनीचे

सांग ना मनातील साजने
आठवते आजही मज
तुझे गालात गोड लाजणे

वेडावला जीव माझा
होतो मी तुझाच सर्वथा
तरीही न कळली तुला
माझ्या मनीची व्यथा

तुझ्या संगे भेटण्यास
जीव होतो वेडापीसा
ये जरा लाजत मुरडत
गुंतला जीव तुझ्यात असा
**************************
लैलेशा भुरे
नागपूर

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704