https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

यशवंत ‘मधील महाविद्यालय विकास समिती नवनिर्वाचित प्रतिनिधींचा सत्कार सोहळा संपन्न

नांदेड:(दि.१९ डिसेंबर २०२३)
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील महाविद्यालय विकास समितीतील प्राध्यापकांचे बिनविरोध नवनिर्वाचित प्रतिनिधी डॉ.अजय टेंगसे, डॉ.एम.ए.बशीर,डॉ.मिरा फड आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे निर्वाचित प्रतिनिधी जगदीश उमरीकर व नुकतेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने शहरी विभागातील उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून डॉ.एम.एम.व्ही.बेग यांची निवड केल्याबद्दल शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला.
प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे या होत्या. विचारमंचावर उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे व सूत्रसंचालक डॉ.संजय जगताप यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी सर्व सदस्यांच्या वतीने डॉ.अजय टेंगसे यांनी यथोचित मनोगत व्यक्त केले. त्यांनी सर्व प्राध्यापकांनी बिनविरोध केलेल्या निवडीबद्दल आभार व्यक्त केले. बिनविरोध निवडीसाठी डॉ. महेश कळंबकर, डॉ.संतोष मोरे, डॉ.एल. व्ही.पदमाराणी राव, डॉ.मिरा फड, डॉ. बालाजी भोसले, डॉ.अजय मुठे, डॉ. वीरभद्र स्वामी यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल अभिनंदन केले.

अध्यक्षिय समारोप उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.संजय जगताप यांनी केले तसेच आभार देखील मानले.
याप्रसंगी स्टाफ सेक्रेटरी डॉ.व्ही.सी.बोरकर, डॉ.एस.एम.दुर्राणी, प्रा.भारती सुवर्णकार, प्रा.पी.पी.सिसोदिया, प्रा.एस.एस.वाकोडे, डॉ.आर.यु.मस्के, डॉ.शिवराज बोकडे, डॉ.कैलास इंगोले, डॉ.विजय भोसले, डॉ.सुभाष जुन्ने, डॉ.शिवाजी सूर्यवंशी, डॉ.साईनाथ बिंदगे, डॉ.साईनाथ शाहू, डॉ.दिगंबर भोसले, डॉ.राजकुमार सोनवणे, प्रा. जी.बी.चौसटे, डॉ.प्रवीण तामसेकर, प्रा,माधव दुधाटे, डॉ.मोहम्मद आमेर, डॉ.संदीप खानसोळे, डॉ.राजरत्न सोनटक्के, डॉ.रमेश चिल्लावार,प्रा.नितीन नाईक, डॉ.साहेब शिंदे, डॉ.ए.एस. कुवर, प्रा.एस.डी.माने, डॉ.श्रीकांत जाधव, प्रशांत मुंगल, डॉ. अजय गव्हाणे आदींची उपस्थिती होती.
नवनिर्वाचित सदस्यांचे कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, कार्यालयीन अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704