https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

गोंडर’ बहुचर्चित कादंबरीला नांदेडचा अण्णाभाऊ साठे साहित्य परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

___________________________________

नांदेड : येथील अण्णाभाऊ साठे साहित्य परिषदेच्या वतिने उत्कृष्ट साहित्य निर्मितीला विशेष सन्मान दिले जातात. या वर्षीचा पुरस्कार अशोक कुबडे लिखित ‘गोंडर’ या कादंबरीला अण्णाभाऊ साठे साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा ‘शंकरभाऊ साठे उत्कृष्ट निर्मितीचा राज्यस्तरीय पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
दिनांक 24 डिसेंबर रोजी नांदेड येथील शुभारंभ सभागृहात हा पुरस्कार महाराष्ट्रातील प्रसिद्ध विचारवंत डॉ.प्रल्हाद लुलेकर आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अशोक कुबडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.या पुरस्कार सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. अशोक कुबडे यांच्या गोंडर कादंबरीला शंकरभाऊ साठे उत्कृष्ट वाङ्‍‍मय निर्मितीचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचे मा.प्रा.संजयकुमार मांजरमकर,मा.लालबाजी घाटे,मा.व्ही.जे. वरवंटकर साहेब,मा.एच.पी. कांबळे,मा.प्रा.जी.एल.सुर्यवंशी,मा.एस.एम.गोरे, डॉ.शंकर गड्डमवार आदी अण्णाभाऊ साठे साहित्य परिषद म.रा.व संयोजन समितीने कळविले आहे.
अशोक कुबडे यांच्या गोंडर या कादंबरीला नाशिक येथील कादवा प्रतिष्ठानचा तसेच नागपूर येथील साहित्य विहार संस्थेचा आणि आमरावतीचा विठ्ठल वाघ तिफन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून अनेक पुरस्कार महाराष्ट्रातील अनेक जाहीर झालेले आहेत..

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704