https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

एम सी आर न्यूज “तारूण्याच्या उंबरठ्यावर : कवयित्री लैलेशा भुरे

*तारूण्याच्या उंबरठ्यावर*
**************************
प्रेम ही किती तरल,मनस्पर्शी भावना आहे.प्रपोज डे तुम्हाला साजरा करायचा असेल तर प्रथम तुम्ही खरच कुणाच्या प्रेमात आहात का हे स्वतः ला विचारणं खूप गरजेचं आहे.कारण काही लोक फक्त टाईमपास म्हणून या गोष्टी करतात.कुणाच्याही भावनांशी खेळणं चुकीचं आहे.कधीतरी कुठेतरी प्रत्येकाचा जीव जडला असणार.जीव जडून हुरहुरून प्रत्येकजण कधीतरी आपल्याच तंद्रीत नक्की फिरला असणार.पण सर्वच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नाही.कधी कधी प्रेमात नकारही पचवावा लागतो.मग अशावेळी होणारा मानसिक त्रास हळूहळू कमी करू शकतो.शारीरिक जखम भरून यायला वेळ लागते .तसेच मानसिक जखम भरून यायलाही वेळ लागतो.पण ती बरी होऊ शकते.काही प्रमाणात जखमा राहतील पण वेदना नक्कीच कालानुरूप गायब होतील.आपण खूप आशा बाळगतो की ती व्यक्ती आयुष्यात कधीतरी परतून येईल.पण असं होईलच असं नाही.आपण सकारात्मक विचार करावा.जर काही दिवसांनी ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात परतली तर ती व्यक्ती तुमचा एक ऑप्शन म्हणून वापर करत नसेल कशावरून? किंवा ती व्यक्ती कुणाकडून तरी हर्ट झाली म्हणून त्या व्यक्तीला तुमची किंमत कळलेली असेल.शिवाय तुमच्या मानसिक जखमा तोवर भरल्या असतील तर तुम्हाला त्या व्यक्तीला परत आयुष्यात स्वीकार करून जखमेवरच्या खपल्या परत काढायच्या का?हा प्रश्न मनाला विचारायला हवा.
आयुष्य खूप सुंदर आहे आणि तुमच्या आयुष्यात तुमच्याहून महत्वाचं कोणीच नाही.मन मोकळं करायला पाहिजे तर रडून घ्या.पण एका मर्यादेनंतर स्वतः ला सांगा की आता बस.आता त्या व्यक्तीसाठी परत रडणार नाही.तुम्हाला जेव्हा खूप वाईट वाटत असेल तर तुमची आवडती पुस्तके वाचा, विनोदी चित्रपट पहा,सिरिअल्स बघा.अनेक प्रकारे तुम्ही स्वतः ला गुंतवून ठेवू शकता ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल.फिरायला जा,शाॅपिंगला जा, मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारा.थोडक्यात, तुम्हाला जे जे करून आनंद होतो त्या-त्या गोष्टी करा.
तुम्ही जेव्हा दु:खात असता तेव्हा घेतलेले निर्णय बहुदा चुकीचे असतात.तुम्ही स्वतः वर आणि समोरच्या व्यक्तीवर अन्याय करण्याची दाट शक्यता असते.काही काळ कमिटमेंट आणि रिलेशनशिप पासून दूर रहा.तुम्हाला तुमच्या मनात येणारा त्या व्यक्तीचा विचार वेगळ्या विचाराने रिप्लेस करायचा आहे.हळूहळू तुमच्या मेंदूला ती सवय लागेल आणि तुम्ही स्वतः च्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करू शकता.काळाचं मलम सर्व जखमांवर लागू पडतं.तुम्ही परत आयुष्यात खळखळून हसू शकाल.छोट्या छोट्या गोष्टींमध्येही आनंद वाटायला लागेल.
**************************
लैलेशा भुरे
नागपुर

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704