https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचे 14 ते 18 डिसेंबर दरम्यान आयोजन

नांदेड:अखिल भारतीय विद्यापीठ संघ, नवी दिल्ली मार्फत पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये दि. १४ ते १८ डिसेंबर दरम्यान करण्यात आलेले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन दि. १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ४:०० वा. विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या क्रीडा मैदानावर नांदेड येथील नांदेड विभागीय रेल्वे मॅनेजर श्रीमती निती सरकार यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर हे राहणार आहेत. प्रमुख उपस्थितीमध्ये शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू राजकुमार दिवटे व आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल कोच देविदास जाधव हे राहणार आहेत.

या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हीलोबॉल क्रीडा स्पर्धेकरिता महाराष्ट्र, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या पाच राज्यातील विद्यापीठाचे एकूण ११० संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये जवळपास १२०० खेळाडू, २०० प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक तसेच ५५ पंच, २०० आयोजन समिती सदस्य उपस्थित राहणार आहेत.

दि.१४ ते १८ डिसेंवर दरम्यान चालणान्या या स्पर्धा विद्यापीताच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या क्रीडा मैदानावर तसेच इनडोअर हॉल येथे दिवस-रात्र प्रकाशझोतात संपन्न होणार आहेत. एकूण पाच दिवस चालणाऱ्या या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचा निरोप समारंभ व पारितोषिक वितरण समारंभ दि. १८ डिसेंचर रोजी होणार आहे.

या स्पर्धेच्या नियोजनासाठी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समितीचे गठन करण्यात आले आहे.

या स्पर्धेस संलग्नित महाविद्यालयातील खेळाडू, क्रीडा संचालक, शिक्षक व चारही जिल्ह्यातील क्रीडा प्रेमींनी जास्तीत जास्त संखेने उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डी. सर्जेराव शिंदे व क्रीडा विभागाचे प्र. संचालक डी, मनोज रेड्डी यांनी केले आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704