https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

यशवंत ‘ मध्ये चंद्रयान:३ वरील मॉडेल व भित्तीपत्रकाचे उद्घाटन

नादेड: (दि.३१ ऑगस्ट २०२३)
श्री शारदा भवन शिक्षण संस्था संचलित यशवंत महाविद्यालयात नुकत्याच भारताच्या इस्रो या अंतराळ संशोधन व अद्यावत उपग्रह निर्मिती करणाऱ्या संस्थेद्वारे नुकताच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे चंद्रयान:३ यानास दि.२३ ऑगस्ट २०२३ रोजी संध्या. ठीक ६:०४ वा. उतरवून भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे यान उतरविणारा जगामध्ये पहिला देश ठरला असून या इस्रोच्या चंद्रयान:३ मोहिमेबद्दल संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागातील बी.एसी.कॉम्पुटर सायन्स तृतीय वर्षच्या विद्यार्थीनिनि इस्रोच्या चंद्रयान:३ यशस्वी मोहिमेबद्दलची परिपूर्ण माहितिचे प्रतिकृती (मॉडेल) व भित्तीपत्रकाचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू व विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
या प्रसंगी त्यांनी प्रतिकृती (मॉडेल) चे निरीक्षण करून विद्यार्थीनिना चंद्रयान:३ मोहिमेत महिला शास्त्रज्ञाच्या कार्याची माहिती दिली व सर्व विद्यार्थ्यांनिना संगणक क्षेत्रात खूप मेहनत घेऊन अभ्यास करावा; अशी आशा व्यक्त केली.
विद्यार्थीनिनी या चंद्रयान:३ प्रतिकृत्ति (मॉडेल) व भित्तीपत्रकाचे विभागातील प्रा.गुरूप्रसाद चौसटे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कार्य केले.
या प्रसंगी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, विभाग प्रमुख प्रा. नितीन नाईक, प्रा.डॉ.प्रवीणकुमार मिरकुटे, प्रा.गौतम दुथडे, प्रा.डॉ.श्रीकांत जाधव, प्रा.सीमा शिंदे, प्रा.संगीता भुसारे, प्रा.प्रवीण तामसेकर, प्रा.आमरीन खान, प्रा.सचिन वडजे, जगनाथ महामुने यांनी सुद्धा मोलाचे सहकार्य केले.
विभागातील सर्व विद्यार्थ्यांनि चंद्रयान:३ प्रतिकृती (मॉडेल) जवळून अभ्यासपूर्ण निरीक्षण करून भित्तीपत्रकाचे देखिल माहितीचे फोटो घेतले व त्यांच्या वहीत नोंद केली. भित्तीपत्रक लावण्यासाठी प्रणवि काकडे, माणिक कल्याणकर यांनी परीश्रम घेतले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704