ताज्या घडामोडी
साहित्याचा महोत्सव. एकटा मी : लैलेशा भुरे

दु:ख मनातले
आटलेले सारे
निच-यात आता
साठलेले सारे
शमले आता
व्यथांचे क्रंदन
हृदयी माझ्या
मौनाचे स्पंदन
दाह संपला
उरातला माझ्या
घोर शांतता पसरली
मनात माझ्या
अर्थशून्य भासे
सारे जग मजसी
उठती मनात आठवणी
पिळवटून हृदयासी
होतो माझा कधी
माझ्याशीच द्रोह
साद घालतो मला
कवेत घेण्यास डोह
काळजात माझ्या
सुना एक कप्पा
हरवल्या न कळे
कुठे जुन्या गप्पा
जणू स्मृतीभ्रंश व्हावा
निनावी गर्दीत
आपुलाच मी पत्ता
फिरतो मी शोधित
**************************
लैलेशा भुरे
नागपूर