https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

एम सी आर न्यूज कवयित्री आपल्या भेटीला: “जीवन”:लैलेशा भुरे

*जीवन*
**************************
लागलो मी माझ्या दुनियेस विस्मरू
हृदय झाले तिच्या प्रेमात पाखरू

एकटा नसे मी दिवाना तुझा
वेडे तुजसाठी झाले पाने फुले तरू

छळले आयुष्यभर उन्हाने दोघांना
आता एकमेकांवर सावली धरू

जाऊ नये कधी जवळ इतके कुणाच्या
माणूस माणसाला लागेल वापरू

तरेल जग की होईल अधोगती
देवास लागली जर दुनिया ठोकरू

भरती प्रेमाची आली आता कुठे
प्रणयामध्ये उगा नको तू ओसरू

प्रत्येकच माणसाला हाक घालते
कळपातील हरवलेले माझ्यातील वासरू

वाग जरा या जगी माणसापरी
तू आहेस वेड्या माणसाचे लेकरू

विसरून जा सा-या कटू आठवणी
सण गोडव्याने साजरे करू
**************************
*लैलेशा भुरे*
*नागपुर*

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704