https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

राहुल खटे व्यवस्थापक (राजभाषा) यांना पुरस्कार प्रदान

नांदेड प्रतिनिधी: औदुष्यंत कुमार स्मारक पांडुलिपि संग्रहालय, भोपाळ यांच्या वतीने १६ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता राजूरकर राज स्मृती सभागृह, भोपाळ येथे दोन दिवसीय ‘प्रणाम’ या प्रतिष्ठेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नांदेड चे राहुल खटे व्यवस्थापक (राजभाषा) यांना भारतीय स्टेट बँकेत कार्यरत असताना राजभाषा हिंदीचा प्रयोग आणि प्रचार केल्याबद्दल श्री अखिलेश जैन यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात आला आहे. राहुल खटे यांनी राजभाषा हिंदीचा अधिकृत वापर वाढवण्यासाठी हिंदीच्या तांत्रिक स्वरूपाचा व्यापक प्रसार केला असून, त्याचा फायदा अधिकृत कामात हिंदीतून काम करणे सोपे होत आहे. या कामगिरीबद्दल राहुल खटे यांचे भारतीय स्टेट बँकेचे कार्यालय प्रमुख व उप महाव्यवस्थापक प्रियकुमार सरिगला यांनी अभिनंदन केले आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704