https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

यशवंत ‘ मधील जैवतंत्रज्ञान विभागास विद्यापीठ परीक्षेत सुवर्णपदक

नांदेड:(दि.१३ ऑक्टोबर २०२३)
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील जैवतंत्रज्ञान विभागातील बी.एससी. तृतीय वर्षाची विद्यार्थिनी कु.शिवानी रमेश कुऱ्हाडे हिस जैवतंत्रज्ञान या विषयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, उन्हाळी २०२३ या परीक्षेत श्री.व्ही.व्ही.वाघमारे मॅथमॅटिक्स टीचर सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. या सुवर्णपदकाचे प्रायोजक प्राचार्य, संगणक शास्त्र आणि माहिती व तंत्रज्ञान महाविद्यालय, लातूर हे आहेत.
या सुयशाबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका व इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.एल. व्ही. पदमाराणी राव, जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ.एम.एम. व्ही.बेग, डॉ.ए.आर.सूर्यवंशी, डॉ.व्ही.बी. पाटील, डॉ.बी.वाय.गोट्टीगोल्ला, प्रा.एस. एस.सूर्यवंशी, डॉ.आर डी.कोल्हे, प्रा. सायली चव्हाण, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, कार्यालयीन अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, डॉ.अजय गव्हाणे आदींनी अभिनंदन केले आहे.
———–

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704