https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

शैक्षणिक विकासात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची महत्त्वाची भूमिका. प्रा. डॉ.सय्यद रुखसाना

नांदेड: प्रमुख प्रतिनिधी
11ऑक्टोबर 2023 रोजी प्रतिभा निकेतन महाविद्यालय आयोजित “प्रतिभा” व्याख्यानमालेचे तेरावे पुष्प “शैक्षणिक विकासात आर्टिफिशियल इंटेलिजन्स ची भूमिका” या विषयाने प्रा. डॉ.सय्यद रुखसाना यांनी गुंफले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. दिलीप स्वामी होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ.स्वाती तांडे यांनी केले.शैक्षणिक विकास आर्टिफिशियल इंटेलिजन्ससह शक्य असून
ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय? त्याची कार्यपद्धती काय ? तसेच वेगवेगळ्या प्रकारची ए आय साधने कोणती? विविध क्षेत्रात विशेषता शैक्षणिक क्षेत्रात ए आय ची भूमिका यावर सविस्तर माहिती प्रा. डॉ. सय्यद रुखसाना यांनी दिली.
अध्ययन अध्यापन पद्धती, तसेच विद्यार्थ्यांचे मूल्यमापनात यायचा वापर कसा करावा? याचे दृकश्राव्य माध्यमाच्या साहाय्याने ने मार्गदर्शन केले. ए आय हा मानवी जीवनाचा एक भाग बनला आहे. कोणत्याही नाण्याला दोन बाजू असतातच . ए आय साधने शिक्षणाचा दर्जा वाढविण्यास सहाय्यकरी असले तरी याची काही विपरीत परिणाम होण्याची शक्यता डॉ.रुखसाना यांनी वर्तविली. शेवटी मानव निर्मित आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे विकसित तंत्रज्ञान असून मानवी बुद्धीला आव्हान देऊ शकत नाही असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन कु. मनस्वी पत्रे हिने केले. या कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक वृंद आणि विदयार्थी उपास्थित होते. व्याख्यानमाला यशस्वी करण्याकरिता श्री. राजेश अय्यंगार,अशोक काळे यांचे विशेष सहकार्य लाभले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704