ताज्या घडामोडी

यशवंत महाविद्यालयात स्वच्छता पंधरवाडा उपक्रमाचे आयोजन

दिनांक:(४ ऑक्टोबर २०२३)

श्री शारदा भवन शिक्षण संस्था संचलित यशवंत महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दि. १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर यादरम्यान केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्वच्छता पंधरवाडा या उपक्रमाचे आयोजन दि. १ ऑक्टोबर रोजी करण्यात आले. यशवंत महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने ‘स्वच्छता हीच सेवा” या उपक्रमांतर्गत परिसर स्वच्छता आणि उद्बोधन रॅलीचे आयोजन केले होते.
एक तारीख एक तास या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी महानगरपालिकेच्या उपक्रमात कचरा आणि प्लास्टिक संकलन करून सहभाग नोंदवला.
यशवंत महाविद्यालय ते रोड नंबर २६, रमा माता नगर, रेल्वे स्टेशन परिसर या ठिकाणी जाऊन श्रमदानाच्या माध्यमातून परिसरातील केरकचरा आणि प्लास्टिक यांचे संकलन करून परिसर स्वच्छ केला. त्याचप्रमाणे स्वच्छतेविषयीचे बॅनर घेऊन स्वच्छताविषयक प्रबोधन केले.नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आणि यशवंत महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या स्वच्छता उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ .बी.आर.भोसले, डॉ. मीरा फड, डॉ.दिगंबर भोसले तसेच राष्ट्रीय सेवा योजना कनिष्ठ विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.अभिनंदन इंगोले यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. विद्यार्थी छात्र सेनेचे अधिकारी आणि विद्यार्थी यांचाही या उपक्रमात सहभाग होता.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.