https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

प्रभाग क्रमांक २ मधिल सिंदखाना परिसरातील पाणी पूरवठा सूरळीत करा ! भारतीय जनता पार्टीची मागणी.

मानवत / प्रतिनिधी.

मानवत नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक २ या प्रभागातील सिंदखाना व मांगवाडा या परिसरात नळाला पाणी नियमित येत नसल्यामूळे मानवत नगर परिषदेच्या पाणिपूरवठा विभागाने सूरळती पणे पाणि सोडविण्यात यावेत तसेच कुर्‍हाडे गल्ली येथील नालीला उतार नसल्यामुळे नालीचे पाणि तूंबून मच्छरांचा प्रार्दूभाव वाढत आहे त्यामूळे त्यामूळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तविल्या जात असून न.पा प्रशासनाने नागरि समस्या सोडव्याव्यात अशी मागणी एका निवेदनाद्वारे भाजपाचे अमोल कूर्‍हाडे,नागनाथ कूर्‍हाडे, रवि वाघमारे, उमेश घांडगे, प्रविण मगर, विकास देशमाने , वामन चव्हाण, सोपान सिसोदे, राम कच्छवे, अनिल घाटून यांनी केली आहे.

सविस्तर वृत्त असे की ,
मानवत नगर परिषदेच्या प्रभाग क्र. 2 मधील सिंदखाना व मांगवाडा या परिसरातील नळांना सध्या पाणी येत नाही. या कारणा मुळे या प्रभागातील नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी तारेवरची कसरत करण्याची पाळी येत असून या प्रभागातील व परिसरात नागरिकांना सूरळीत व व्यवस्थीत दाबाने पाणी पुरवठा करण्यात यावा. अशी मागणी मानवत नगर परिषदेच्या मूख्याधिकारी यांच्या कडे भारतीय जनता पार्टीच्या वतीने एका निवेदना द्वारे करण्यात आली.
मानवत शहरातील कुर्‍हाडे गल्ली या भागातील सांड पाणी वाहून नेणार्‍या नालीला उतार नसल्यामुळे या भागातील नाल्या तूंबलेल्या आहेत त्या मूळे घाणसांड पाणी साचत असून त्यावर मच्छरांचा प्रार्दूभाव वाढत त्यामूळे या भागातील परिस्थिती मुळे पाणी जशास तसे साचुन या नालीतील सांडपाणी, घाणपाणी मुळे मच्छरांचा प्रादुर्भाव वाढत आहे त्या मुळे या परिसरातील नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
त्यामूळे मानवत नगर परिषदेच्या मूख्याधिकारी यांनी भागात प्रत्येक्ष पाहणी करून सामान्य नागरिकांच्या नागरी समस्या सोडव्याव्यात अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने एका निवेदना द्बारे करण्यात आली.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704