पालकमंत्री मेघनाताई साकोरे, बोर्डिकर यांचा मानवत येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने नागरी सत्काराचे आयोजन

मानवत / प्रतिनिधी.
——————————————
मानवत तालूका भाजपा ग्रामीण मंडळ अध्यक्ष हरिभाऊ निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाले भाजपा तालूकाकार्यालया मध्ये महत्वाची बैठक घेण्यात आली.
मानवत येथे 14 जुनला मेघनाताई बोर्डीकरांचा मानवत भाजपा च्या वतीने पालकमंत्री सन्मान सोहळा..
मेघनाताई बोर्डीकर पालकमंत्री झाल्यानंतर मानवत तालुका भाजपाच्या वतीने भाजपा नेते अंनतराव गोलाईत यांनी बोर्डीकरांचा पालकमंत्री सन्मान सोहळा आयोजित केला आहे. 14 जुनला मानवत येथील रेणुका मंगल कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन केले असुन पाथरी विधानसभेतील भाजपाचे कार्यकर्ते आणि मानवत शहरवासीय आणि ग्रामीण भागातील जनतेला यासाठी आमंत्रीत करण्यात आले आहे.
प्रथमच परभणी जिल्हयाला भाजपाचा पालकमंत्री मिळाला आहे. जिल्हयातील भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षाच्या नेत्या मेघनाताई बोर्डीकर पालकमंत्री झाल्यामुळे आनंदाचे वातावरण असुन मानवत तालुका भाजपाने आता पालकमंत्री सन्मान सोहळा ठेवला आहे. भाजपा नेते अनंतराव गोलाईत आणि भाजपाचे प्रमुख पदाधिकारी कार्यक्रमाचे आयोजक असुन याव्दारे पाथरी मतदार संघातील भाजपा कार्यकार्ते पुन्हा एकदा सक्रीय होणार आहेत. विधानसभेत भाजपाला 90 हजार मतदान करणाऱ्या जनतेचे स्वप्न पुर्ण करुन मानवत तालुक्याच्या विकासासाठी व एकुणच पाथरी मतदार संघामध्ये भाजपाच्या मजबुती करणासाठी या मेळाव्याच्या माध्यमातुन पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांना आग्रह करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला नुतन जिल्हाध्यक्ष श्री सुरेश भुमरे यांच्यासह पक्षाचे महत्वाचे पदाधिकारी उपस्थित राहणार असुन कार्यक्रमाची जय्यत तयारी चालु असल्याची माहिती आयोजक अनंतराव गोलाईत, हारीभाऊ निर्मळ, संदीप हंचाटे यांनी दिली. या सोहळयात महाराणा प्रताप चौक ते मुख्य बाजारपेठेतुन रेणुका मंगल कार्यालय पर्यंत मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. मानवत तालूका मंडळ अध्यक्ष हारीभाऊ दत्तात्रय निर्मळ आदींची उपस्थिती होती.
**