https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

कावड यात्रा भारतात नाही तर पाकिस्तनात काढायची का ? तमाम महाकाल भक्तांचा संतप्त सवाल.

भाजपा पदाधिकाऱ्यांचा राज्याच्या गृहमंत्र्यांना संतप्त सवाल तहसीलदार मार्फत दिले निवेदन

मानवत /प्रतिनिधी

श्रावणामध्ये शिवशंभो महादेवाला प्रसन्न करण्यासाठी *महाकाल* शिव भक्त काढतात. मानवत शहरातून महाकाल भक्तांनी कावडयात्रा काढून लज अभिषक शिवशंभो महादेवाला केला पण मानवत पोलिसांनी जिल्हाधिकारी यांचा आदेश मोडला असल्याची बतावणी करत गून्हे दाखल केले तर, कावड यात्रा भारतात नाही तर पाकिस्तनात काढायची का ? असा संतप्त सवाल महाकाळ भक्त तथा भाजपाचे पदाधिकाऱ्यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांना निवेदनातून तहसीलदार मार्फत विचारला असल्याने सत्तेत असलेल्या भाजपाला एक प्रकारे घराचा आहेर दिला असे चित्र मानवत येथील कावड यात्रेतील आयोजक वर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यावरून दिसत आहे .

या बाबत अधिक माहिती अशी की मानवत येथे नुकत्याच निघालेल्या कावड यात्रेत आयोजकावर गुन्हे दाखल करण्यात आले त्या अनुषंगाने भाजपाच्या पदाधिकाऱ्याच्या वतीने प्रशासनाला निवेदन देऊन त्यांचा विचारण्यात आला त्या निवेदनात त्यांनी असे नमूद केले की २८ ऑगस्ट रोजी मानवत शहारत महाकाल कावड यात्रेचे आयोजन महाकाल भक्ताकडून काढण्यात आले होती हि कावड यात्रा हि कायदा व सुव्यवस्था चे पालन करीत शांततेत व भक्तिमय वातावरणात काढण्यात आली या कावड यात्रे दरम्यान कुठेही कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे कृत्य झाले नाही किंबहुना तसा प्रयत्न देखील झाला नाही मग अशा प्रकारे कावड यात्रा वर गुन्हा दाखल करून पोलीस प्रशासन काय साध्य करू लागले आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच भारत हा जगाच्या पाठीवर हिंदू देश म्हणून आपली ओळख निर्माण करीत असताना केवळ कावड यात्रा काढली म्हणून गुन्हा नोंदवणे म्हणजे हिंदू सण , संस्कृती वर मोठा आघात केला जात आहे. मानवत पोलिसांनी या पूर्वी देखील आकस वृत्तीने शिवजयंती , डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी महापुरूषांच्या जयंती उत्सवात देखील अशा प्रकारचे गुन्हे नोंदवून उत्सवात विरजण टाकण्याचे काम केले आहे . या निवेदनाद्वारे आपणास विचारू की कवाड यात्रा , रामनवमी आदी हिंदूंचे सण हे भारतात नाही तर पाकिस्तनात साजरे करायचे का? मानवत येथील कावड यात्रा उत्सवात गुन्हे नोंदवणे यात फार मोठे राजकारण केला असल्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच जर प्रशासनाने कावड यात्रे वर राजकीय द्वेषा पोटी हे दाखल केलेले गुन्हे मागे न घेतल्यास भाजपा युवा मोर्चा च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची घ्यावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले या निवेदनावर आयोजक भाजपा युवा मोर्चा तालुका प्रमुख तथा राजेश लक्ष्मणराव कच्छवे , भाजपा लोकसभा परभणी समन्वयक डॉ सुभाष कदम व सुभाष जाधव यांच्या सह अनेक शिवभक्त नागरिकांसह महाकाळ भक्तांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704