https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानवत तालूक्यासह शहरात अज्ञात चोरांचा सूळसूळाट.नागरिकांमधून भितिचे वातावरण.

हत्तलवाडी येथील दुचाकी चोरीस ; अज्ञात चोरट्या विरुद्ध मानवत पो.स्टे. मध्ये गुन्हा दाखल

मानवत \ प्रतिनिधी.

मानवत तालुक्यातील मौ. हत्तलवाडी येथील दिलीप कापसे यांच्या घरासमोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याची घटना घडली.
सविस्तर वृत्त असे की,
मानवत तालूक्यातील हत्तलवाडी येथील शेतकरी दिलीप एकनाथ कापसे यांच्या मालकिची दुचाकी जिचा क्र. एम. एच.२२ ए. एल.०८६१ ही मोटारसायकल नेहमी प्रमाणे त्यांच्या घराबाहेरील परिसरात लावली होती. परंतु २६ ऑगस्ट रोजी सकाळी पाहिले असता त्या ठिकाणी मोटार सायकल आढळून आली नाही व मोटार सायकलचा आजूबाजूला शोध घेतला असता. ती कुठेही आढळून आली नाही. आपली मोटार सायकल चोरी झाल्याचे समजताच फिर्यादी शेतकरी दिलीप कापसे यांनी मानवत पोलिसांत अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. असुन अज्ञात चोरट्या विरूध्द मानवत पोलीस तपास करीत आहेत.
मानवत शहरासह तालूक्यात अज्ञात चोरांचे प्रमाण वाढत असल्यामूळे नागरीकांत भितीचे वातावरण निर्माण होत आहे. पोलिस प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून भूरट्या चोरासह अज्ञात चोराचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीकांतून जोर धरत आहे.

**

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704