https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विविध मागण्यासाठी गोदेच्या पात्रात जलसमाधी आंदोलन

मानवत / प्रतिनिधी.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वतीने विविध मागण्यासाठी २३ ऑगस्ट रोजी रामपुरी येथील गोदावरी नदी पात्रात जलसमाधी आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर कोणाचेही लक्ष नसल्याचे दिसून आहे. याचेच उदारहण म्हणजे वास्तवात तालुकात २४ दिवसाचा सतत पावसाचा खंड पडला आहे. तसेच नियमाने २१ दिवसांचाच पावसाचा खंड पडल्यानंतर पिक विम्याची अग्रीम रक्कम मिळणे अनिवार्य आहे. परंतु मानवत तालुक्यामध्ये काही महसूल मंडळ मध्येच गेल्या २४ ते २६ दिवसापासून सतत पावसाचा खंड आहे. असे असताना प्रसासन मात्र त्या वर काही ही कारवाई करत नसल्या मुळे मानवत तालुक्यातील शेतकऱ्या सह स्वाभिमा नी शेतकरी संघटनेचा वतीने रामपुरी येथील गोदावरी नदी पात्रात जल समाधी आंदोलन करण्यात आले. दरम्यान तीन तास आंदोलन सुरु असता आंदोलन स्थळी महसूल, कृषी आणि पिक विमा कंपनी यांचे कर्मचारी झाले नव्हते हजर राहणे आवश्यक असताना केवळ पोलीस प्रशासनाला कळवून तिथे हजर राहण्याचे सांगितले असल्याचे लक्षात आले. हे पाहून जमलेल्या आंदोलकांनी तीव्र रोष व्यक्त केला. दरम्यान तीन तास चाललेल्या आंदोलनातील आंदोलन कर्त्याशी कर्मचाऱ्यांनी चर्चा करुन समाधान केले व लवकरच शेतकरी निहाय पंचनामे सुरू करण्याचे आदेश मा. जिल्हाधिकारी यांच्या कडून निघणार असल्याचे सांगितले जवळपास एक तासाच्या चर्चेनंतर दुपारी दोन वाजता हे आंदोलन परत घेण्यात आले. आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर भाऊ ढगे, भास्कर कटिंग, रामभाऊ आवरगंड, रामप्रसाद गमे मामा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विठ्ठल चौखट, नामदेव काळे, गोपाळ यादव, श्रीकांत डासाळकर, शिवाजी चौखट, दत्ता परांडे, हनुमान यादव, श्याम साठे सुरज चौखट, हनुमान यादव, अंकुश यादव, तुकाराम मसलकर, केशव सोरेकर, अण्णासाहेब चौखट, उद्धव चौकट, संजय चौखट, शरद यादव, दीपक यादव, योगेश चोखट यांच्या सह शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रसासनाचा वतीने तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704