https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीच्या संधी या विषयावर मानवत पोलीस स्टेशनमध्ये कार्यशाळा संपन्न

मानवत / प्रतिनिधी.
मानवत येथील पोलीस निरीक्षक श्री. दिपक दंतुलवार यांच्या मार्गदर्शना खाली म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीच्या संधी या विषयावर मानवत पोलीस स्टेशनं मध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी एच.डी. एफ. सी. बँकेच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
सविस्तर माहिती अशी की,
मानवत पोलीस स्टेशन मध्ये नुकतेच श्री. दिपक दंतुलवार हे नूतन पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झाले आहेत ते आल्यापासून त्यांनी मानवत शहरात पोलीस स्टेशनची आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
त्यांनी पोलीस स्टेशन व परिसरातील असलेले सर्व घाण साफ करून पोलीस स्टेशनचा परिसर स्वच्छ केला पोलीस स्टेशन समोरील असलेले जप्त वाहने नगरपालिकेच्या जागेमध्ये सुरक्षित रित्या हलविण्यात आले त्या मुळे पोलीस स्टेशनने मोकळा श्वास घेतला असे ही नागरिकांतून चर्चा होऊ लागली त्यातच आता पोलीस निरीक्षक दिपक दंतुरवार यांनी मॅच्युअल फंड मधील गुंतवणुकीच्या संधी या विषया वर मार्गदर्शन पर कार्यशाळेचे आयोजन करून मानवत पोलीस स्टेशनला वेगळा आयाम देण्याचा प्रयत्न केला यावेळी एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापक श्री. भोंबे व स्वप्निल चिद्रवार या दोघांनी मानवत येथील पोलीस कर्मचाऱ्यांना या बद्दल मार्गदर्शन केले असा आगळा वेगळा कार्यक्रम मानवत पोलिसांनी केल्यामुळे मानवत शहरात पोलीस स्टेशन बद्दल चर्चा रंगू लागली आहे.
पोलीस निरीक्षक शारीरिक दृष्ट्या सुदृढ राहण्यासाठी सायकल वर कार्यालयात ये जा करतात मॅरेथॉन स्पर्धा ही घेतात अशा प्रकारच्या कार्यशाळेचे आयोजन करतात शालेय विद्यार्थ्यांना युवतींना तरुणींना महा विद्यालयात शाळेत जात असताना कुठल्या ही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून निर्भया व दामिनी पथक कार्यान्वित करतात त्यातच या पथकाला स्वतःहून भेट देतात यामुळे पोलीस स्टेशन मानवत हे तक्रारी, भांडणे, वाद मिरवणूक, शांतता कायदा व सुव्यवस्था याच्या वर ही सामाजिक उपक्रम घेऊ शकतो असा संदेश सध्या मानवत शहरवासीयांना देत आहे असे बोलले जाते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704