https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील विचारच मानवाला तारू शकतील – डॉ.संजय कसाब

नांदेड:(दि. १ ऑगस्ट २०२३)
यशवंत महाविद्यालयात यशवंत प्रबोधन व्याख्यानमाला समितीद्वारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त इंग्रजी भाषा प्रयोगशाळा येथे स्वातंत्र्य सेनानी सूर्यभान पवार महाविद्यालय, पूर्णा येथील मराठीचे प्रा.डॉ.संजय कसाब यांचे ‘साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील परिवर्तनवादी विचार’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेशचंद्र शिंदे होते तर मंचावर उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे, यशवंत प्रबोधन व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ.संदीप पाईकराव आणि सूत्रसंचालक डॉ.मीरा फड यांची उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रमुख वक्ते डॉ.संजय कसाब म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढली पाहिजे. आजच्या मानवी मूल्याच्या अध:पतनाच्या काळात साहित्यातील विचारच समाजाला आणि मानवाला तारू शकतील. या दृष्टीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य समृद्ध आणि मोलाचे आहे. अण्णाभाऊंनी भांडवलशाहीत पिसल्या गेलेल्या माणसांना तसेच दिन,दलित दुबळ्यांना आपल्या साहित्यातून न्याय देण्याचा प्रयत्न केला.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विश्वविद्यालयाचे माजी प्र कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे अध्यक्षीय समारोपात बोलताना म्हणाले की, साहित्यरत्न अण्णाभाऊंना आपल्या विचारात उतरवायचे असेल तर अण्णाभाऊंचे साहित्य वाचन केले पाहिजे. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य अत्यंत समृद्ध आणि उच्च कोटीचे आहे; त्यामुळेच जगातील अनेक भाषांमध्ये त्यांच्या साहित्याचा मोठ्या प्रमाणात अनुवाद केला गेला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक डॉ.संदीप पाईकराव यांनी केले सूत्रसंचालन डॉ.मीरा फड यांनी तर आभार डॉ.ज्ञानेश्वर पुपलवाड यांनी मानले.
याप्रसंगी समिती सदस्य प्रा.गौतम दुथडे, डॉ.मीरा फड, डॉ.ज्ञानेश्वर पुपलवाड, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, कार्यालयीन अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, डॉ.अजय टेंगसे, डॉ.एल.व्ही.पदमाराणी राव,डॉ.अजय गव्हाणे, डॉ.साईनाथ शाहू, डॉ.संजय जगताप, डॉ.व्ही.सी.बोरकर, डॉ. संदीप खानसोळे, डॉ.शिवराज सिरसाट, डॉ.विजय भोसले डॉ.सुभाष जुन्ने,डॉ.मंगल कदम, डॉ.नीताराणी जयस्वाल,डॉ.शिवराज बोकडे,डॉ.राजश्री भोपाळे, डॉ.मस्के, डॉ.धनराज भुरे, डॉ.रामराज गावंडे, डॉ.बालाजी भोसले, प्रशांत मुंगल आदी प्राध्यापकवृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704