https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानवत येथील के. के. एम.महाविद्यालयात हेल्थ अँड हॅपिनेस कार्यशाळा संपन्न

मांनवत / प्रतिनिधी.

मानवत येथे राष्ट्रीय सेवा योजना के. के. एम. महाविद्यालय मानवत व मानवत नगरपरिषद मानवत यांच्या संयुक्त विद्यमाने “हेल्थ अँड हॅपिनेस वर्क शॉप ” दि.25 .7 .23 रोजी घेण्यात आला.
या वेळी कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या वेळी बोलतांना ते म्हणाले की विद्यार्थ्यांनी बौद्धिक विचारांची परंपरा आत्मसात करावी यातूनच विद्यार्थ्यांमध्ये , आत्मविश्वास एकाग्रता वाढते .विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास बरोबर जीवनाचे कौशल्य निर्माण करावेत. या वेळी प्रमुख मार्गदर्शक मानवत नगर परिषदेच्या मुख्याधिकारी मा. कोमल सावरे (मुख्याधिकारी नगरपरिषद मानवत ) यांनी विद्यार्थ्यांनी आरोग्य व आनंदी जीवन कसे जगावे “जीवन जगण्याची कला “आत्मसात करून आजच्या आधुनिक काळात ताण तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी मानसिक शांतता टिकविणे, ध्यानधारणा प्राणायाम ,सुदर्शन क्रिया , भस्त्रिका क्रिया इ. ” आर्ट ऑफ लिविंग” कार्यक्रमात प्रात्याक्षिक कृती विद्यार्थ्यांकडून करूण घेण्यात आली.
यासाठी श्री दीपकजी शर्मा उपस्थित होते. या वेळी सूत्रसंचालन व प्रस्ताविक प्रा.डॉ. सुनिति कुकडे यांनी केले आणि “माझी वसुंधरा हरित व प्रदूषण मुक्त कशी राहील” याची विद्यार्थ्यांकडून शपथ घेतली. आभार उपप्राचार्य डॉ. .हुगे के जी यांनी मानले.या कार्यक्रमासाठी प्राध्यापक यांच्या सह महाविद्यालयीन विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704