https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

नेट (कनिक्टिव्हीटी ) बंद झाल्याने मानवत येथील राष्ट्रीयकृत बँकेचे व्यवहार ठप्प

मानवत / प्रतिनिधी.

मानवत येथील आठवडी बाजार परिसरात असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे बुधवारी काही काळ नेट कनिक्टिव्हीटी बंद झाली होती यामुळे बँकेचा व्यवहारावर मोठा परिणाम झाला. तसेच दुपारपासून नेट कनिक्टिव्हीटी धिम्या गतीने चालू असल्यामुळे बँकेतील अनेक व्यवहार ठप्प झाले होते. एकीकडे पारदर्शक आणि तात्काळ कामे व्हावे म्हणून सर्वत्र संगणकिय प्रणालीचा वापर करण्यात येत आहे तर एकीकडे याच संगणकिय प्रणालीमुळे अनेक ऑनलाईन कामे खोळंबत आहेत याचीच प्रचिती बँकेत दिसून आली यामुळे ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. देशातील सर्वात मोठी राष्ट्रीयकृत बँक म्हणून ओळख असले ल्या बँकेचे दुपार पासून काही काळ नेट कनिक्टिव्हीटी बंद झाल्याने बँकेचा व्यवहारावर परिणाम दिसून आला. नेहमी वर्दळ असणाऱ्या बँकेत कनि क्टिव्हीटी बंदमुळे शुकशुकाट दिसून आला.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704