https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

अमरनाथच्या गुहेतून…* भाग १४ लेखक: धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर

नांदेड:
कालच्या भागात मी परतीच्या प्रवासाच्या अनिश्चतेबाबत लिहून लेख समाप्त केल्यामुळे दिवसभर सारखा मोबाईल वाजत होता. शेकडो जणांनी कुठपर्यंत आलात व सुखरूप आहात का याची विचारणा केली. त्यामुळे जास्त सस्पेन्स न वाढवता सुरुवातीलाच सांगून टाकतो की, आम्ही २६ यात्रेकरू रेल्वेने आणि ४५ यात्रेकरू विमानाने सुखरूपपणे आपापल्या घरी पोहोचलो आहोत. भोलेनाथाच्या कृपेने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यात्रा निर्विघ्नरित्या पार पडली आहे.

अवघड अशी असणारी यात्रा पूर्ण करण्यासाठी मिल्ट्री वाले आणि लंगरवाल्यांचे योगदान फार महत्त्वपूर्ण आहे. आमच्या ग्रुप साठी
खा. प्रतापराव पाटील चिखलीकर,डॉ. अजयसिंह ठाकूर पूर्णा,मनोज शर्मा नागपूर, सरदार कुलदीपसिंघ लुधियाना,ओमप्रकाश पाम्पटवार,प्रतिभा राजेंद्र चौधरी परभणी,सतीश सुगनचंदजी शर्मा,नवनाथ सोनवणे उदगीर, हृदयनाथ सोनवणे,ज्ञानोबा जोगदंड जम्मू,नागेश शेट्टी, सरदार जागीरसिंघ अमृतसर,सुभाष बंग,निलेश बोंबले व गोपाळ नागपुरे अकोला यांनी दरवर्षीप्रमाणे प्रत्येकी एक जेवण दिल्यामुळे माझे बरेचसे काम सोपे झाले. ७१ यात्रेकरूंच्या एका वेळेसच्या नाश्त्यासाठी योगदान देणाऱ्यामध्ये स्नेहलता जैस्वाल हैद्राबाद ,प्रदीप शुक्ला भोपाळ,सरदार कुलदीपसिंघ लुधियाना,महेश जायस्वाल यवतमाळ यांचा समावेश आहे. आमच्या सोबत असलेल्या यात्रेकरूंपैकी अशोक जायस्वाल पूर्णा, मिना कुलकर्णी,अरुण लाठकर,दिगम्बर शेंदूरवाडकर, श्याम रावके, शशिकांत कुलकर्णी,मुकेशसिंह तौर, गंगाधर फलटणकर, रेखा देशपांडे, श्रीकांत कुलकर्णी, सुधाकर ब्रह्मनाथकर,विशाल राठी, ब्रिजकिशोर दरक, विशाल मंत्री, बालाजी कवाणकर, शंकरराव देशमुख यांनी जागोजागी अन्नदानासाठी सहकार्य केले.

एखादा संघ जिंकला की, सर्व श्रेय कॅप्टनला जाते पण त्यात सर्वांचे योगदान असते. हा टूर यशस्वी होण्यामध्ये देखील अभय शृंगारपुरे, सुभाष देवकते, अमोल गोले यांचे योगदान खूप मोठे आहे.सर्वच यात्रेकरूंनी वेळोवेळी समजूतदारपणा दाखवल्यामुळे यात्रा यशस्वी झाली. आणि विशेष म्हणजे आपल्या सारख्या हजारो वाचकांच्या व नांदेडकरांच्या सदिच्छा आमच्या पाठीशी असल्यामुळे आम्ही यशस्वी झालो. यात्रेत सहभागी झालेल्या काही यात्रेकरूंच्या निवडक प्रतिक्रिया खालील प्रमाणे आहेत.

*मीना कुलकर्णी*
मी एकटीच महिला यात्रेला येत असल्यामुळे खूप भीती वाटत होती.नोंदणी करताना दिलीपभाऊंनी धीर दिल्याप्रमाणे संपूर्ण यात्रा कौटुंबिक वातावरणात पार पडली.भाऊ आपण यात्रेसाठी घेत असलेली चालण्याची व प्राणायामची पूर्वतयारी किती आवश्यक आहे ते पदोपदी जाणवलं.आमच्या कडून घेतलेल्या टूर कॉस्ट पेक्षा तुम्ही जास्त सुविधा दिल्या.आपण निवडलेले हॉटेल व हाऊसबोट अतिशय उत्तम होते.आवश्यक असेल तिथे एसी बसेस उपलब्ध करून दिल्या.रेल्वेत देखील एसी थ्री टायर ची निवड केली. तेरा दिवसाच्या कालावधीत आपल्या मित्र परिवारातर्फे मोफत करण्यात आलेली जेवणाची व नाश्त्याची व्यवस्था दर्जेदार होती.प्रवासा दरम्यान आपण घेतलेले वेगवेगळे खेळ व केलेले मनोरंजन यामुळे वेळ कधी संपला हे कळाले देखील नाही. तुमच्यातला नेतृत्वगुण मला विशेष आवडला. कोणाकडून कसे काम घ्यायचे ? सगळ्यांनाच सन्मान कसा मिळेल याची दक्षता घेणे. प्रत्येकाच्या अंगात असलेल्या सुप्त कलागुणाला प्रगट करण्याची संधी देणे, यात्रेदरम्यान कोणी चुक केली तर त्याला न दुखवता त्याची चूक दाखवायची.तुम्ही एकटे असताना देखील सर्व ग्रुपवर कंट्रोल अतिशय उत्तम ठेवला त्याबद्दल विशेष अभिनंदन. आम्ही एकदाच अमरनाथला आलो तर धन्य झालो पण दिलीपभाऊंनी २१ वेळेस ही अवघड यात्रा पूर्ण केली यामुळे परमेश्वर त्यांच्या पाठीमागे आहे हे सिद्ध होते.बाबा अमरनाथ आपले राजकीय भवितव्य निश्चितच चांगले ठेवेल यात शंका नाही.

*श्रीकांत कुलकर्णी पुणे*
महाराष्ट्रातील लोक टूर साठी पुण्यामुंबईत येतात पण आम्ही पुणे सोडून नांदेड सारख्या ठिकाणी जात असल्यामुळे अनेकांनी नावे ठेवली. त्यामुळे आम्हाला ही काळजी वाटत होती.पण इतर नामांकित टूर कम्पन्यापेक्षा आपली व्यवस्था उत्तम होती. दिलीपभाऊंचे नियोजन उत्तम असल्यामुळे कौटुंबिक वातावरणात यात्रा पार पडली.सर्वाचे नाते दृढ व आपुलकीचे बनले आहेत.यात्रेनिमित्त भाऊनी घेतलेले परिश्रम निश्चीतच गौरवास्पद असुन पुढील टुरसाठी शुभेच्छा.

*ब्रिजकिशोर व स्वाती दरक परभणी*
आदरणीय दिलीपभाऊ, आपला अनुभव आणि आमचे नशीब यामुळे आपली सर्वांची अवघड वाटणारी यात्रा निर्विघ्नपणे पार पडली,नवीन ओळखी झाल्या.त्यामुळे १३ दिवसांचा कालावधी कुठे गेला ते कळलेच नाही.दर्शन अतिशय शांतीपूर्ण झाले,मनाला शांती व समाधान मिळाले.आपल्या मॅनॅजमेण्ट बद्दल जेवढं कौतुक करावे तेवढे कमी आहे.
आपल्या पुढच्या टूर मध्ये आपण परत भेटणारच आहोत.धन्यवाद!

*मनोरमा व अरुण लाठकर*
तुमच्यासोबत अमरनाथला जाण्याचा योग हा खरोखरच खूप चांगला अनुभव आहे.
संपूर्ण ग्रुपसाठी तुम्ही केलेली व्यवस्था उत्तम आहे. अमरनाथ खूप अवघड आहे, पण तुम्ही आम्हाला प्रवासात ज्या पद्धतीने मार्गदर्शन केले आहे ते खूप कौतुकास्पद आहे.तुमचा पूर्वीचा २०वर्षाचा अनुभव या यात्रेत खुप ठिकाणी जाणवत होता.पुढील यात्रांमध्ये आम्ही तुमच्यासोबत राहू यांची ग्वाही देतो.धन्यवाद दिलीपभाऊ.

*पल्लवी और शशिकांत कुलकर्णी*
आपके साथ अमरनाथ की यात्रा करना वास्तव में एक बहुत अच्छा अनुभव है।
आपके द्वारा पूरे समूह के लिए की गई व्यवस्थाएँ उत्कृष्ट थी । यात्रा शुरू होने से पहले हमें पता चला कि अमरनाथ दर्शन बहुत कठिन है, लेकिन जिस तरह से आपने हमें गुफा तक जानेके लिए मार्गदर्शन किया है वह बहुत सराहनीय है।
आपके पिछले अनुभव से पूरा दौरा अच्छी तरह से आयोजित किया गया था और हम आने वाली यात्राओं में भी आपके साथ रहना चाहते हैं।बहुत बहुत शुभकामनाएँ दिलीपभाऊ।

*सुनिता व बालाजी लाटकर*
दिलीपभाऊ, खरोखरच या खडतर यात्रेदरम्यान तुमच्या राजकीय ,सामाजिक ‘कौटुंबिक जीवनातून वेळ काढून , स्वत: आपल्या कुटुंबाप्रमाणे यात्रेदरम्यान आमचे पालकत्व पार पाडले. त्यासाठी भाऊ तुमचे विशेष “आभार “.तुमची आम्हाला यात्रेदरम्यान जवळून संगत लाभली आणि तुमच्यातील कलागुणांचे दर्शन झाले. तुमच्या मार्गदर्शनाखाली यात्रा सुलभ व आनंददायी झाली. निश्चितच या यात्रेतून मिळालेली ऊर्जा सर्वांना जीवनभर उपयोगी पडेल. खूप खूप शुभेच्छा.

*जयश्री व गंगाधर फलटणकर*
दिलीप भाऊ,अमरनाथ यात्रा सूखकर पूर्ण झाली. आपले नियोजन आणी व्यवस्थापन खूपच छान होते. भोलेनाथ कृपेने सर्वांचे दर्शन सूखकर झाले. आपल्या कष्टाला आणि मेहनतीला भगवंताची साथ आहे. त्यामुळेच यात्रा सूखकर झाली.
समाधान वाटले. मनःपूर्वक आभार.

*रेखा व विशाल राठी, संभाजीनगर*
जसे म्हणतात बाबा बोलवत नाही तोपर्यंत दर्शन घडत नाही. आमच्या बाबतीत बाबांसोबत दिलीपभाऊ आपलाही वाटा खूप मोठा आहे. तुमच्या निमित्तानेच आमची अमरनाथ यात्रा झाली.वयाने सर्वात लहान असून कुणाचा मन दुखावला गेला असेल तर मी माफी मागतो.उत्तम व्यवस्था, त्याहूनही उत्तम व्यवस्थापन आणि यात्रेकरूंना एकत्र करून त्यांना इन्व्हॉल्व्ह करून एक चांगला वातावरण निर्माण केलीत त्याबद्दल तुमची प्रशंसा केलीच पाहिजे.पायी यात्रा करण्याच्या उद्देशानेच आम्ही आलो होतो, हट्ट केला म्हणून परत एकदा माफी मागतो. तुमची बाजू समजून होतो पण मनाची आणि शारीरिक तयारी आम्ही पुरेपूर केली होती. आशा आहे आम्ही तुम्हाला निराश केले नाही.यात्रेच्या निमित्ताने आम्ही तुमच्याशी जुळलो. तुमच्या पुढच्या सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली तर आमचे भाग्य.सर्वांचे आभार.

*दिगंबर शेंदुरवाडकर, परभणी*
दिलीपभाऊ,रिफंडचे आपण तत्परतेने पैसे पाठवले खूप खूप धन्यवाद.
आपल्या नेतृत्वाखाली आमची अवघड अशी अमरनाथ यात्रा सफल झाली, आपले पुण्य आमच्यासाठी कामास आले, आपणास पुढील जीवनात यशस्वी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.विशेषतः आपला राजकीय उत्कर्ष व्हावा ही परमेश्वर चरणी प्रार्थना. आपण जेव्हा परभणीत येताल तेव्हा जरूर फोन करणे आवश्यक भेट घेईन.धन्यवाद…

*शंकरराव देशमुख कंधार*
अमरनाथच्या प्रवासाबद्दल सुभाष देवकते यांनी मला प्रोत्साहित केले. प्रवास अवघड होता याचीही कल्पना दिली. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली दिलीप ठाकूर यांची प्रतिमा मला माहित होती. अमरनाथ यात्रेचा वीस वर्षाचा प्रवास, आणि अडचणी त्यांना माहीत होत्या. म्हणून मी वयाची ७० वर्ष होत असतानाही अमरनाथ यात्रेसाठी तयार झालो. काही नैसर्गिक आपत्तीमुळे अमृतसरून दिल्लीला येताना आम्ही विचलित झालो.थोड्याफार अडचणी आल्या पण एकंदरीत प्रवास आपली उत्तम नियोजन व्यवस्था, वाखाण्याजोगी आहे. आपले आभार.

वाचक मित्रानो,गेले १४ दिवस आपल्या सारख्या हजारो वाचकांनी अमरनाथच्या गुहेतून ही लेखमाला वाचली. आपल्याला ही लेखमाला कशी वाटली याबद्दल आपल्या प्रतिक्रिया ९४२१८ ३९३३३ या मोबाईलवर आवर्जून पाठवाव्यात. उद्याच्या शेवटच्या लेखामध्ये निवडक प्रतिक्रियांचा समावेश करण्यात येणार आहे.धन्यवाद

चराग़ों को आंखों में महफ़ूज़ रखना
बड़ी दूर तक रात ही रात होगी !

मुसाफ़िर हैं हम भी मुसाफ़िर हो तुम भी
किसी मोड़ पर फिर मुलाक़ात होगी!!
( क्रमशः )

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704