https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानवत येथील देवी मंदीर रोडवरील टेलरिंग मटेरियल दुकानाला आग लाखो रुपयाचे साहित्य जळून खाक

मानवत / प्रतिनिधी.

मानवत शहरातील देवी मंदीर रोड वर असलेल्या टेलरिंग मटेरियल दुकानाला आग लागुन लाखो रुपयाचे साहित्य जळून खाक शहरातिल देवी मंदिर रोड परीसरातील मानवत नगर परिषदच्या शॉपिंग सेंटर मधील जावेद अब्दुल मन्नान मनियार यांच्या टेलरिंग मटेरियलच्या दुकानाला दिनांक ३१ डिसेंबर रोजी रात्री अडीच वाजता इलेक्ट्रिक शॉट सर्किट मुळे आग लागल्याने दुकानातील टेलरिंगचे सामान काच बटनच्या शिलाई मशीन व दुकानातील फर्निचर जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच मानवत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद बनसोडे, सय्यद फय्याज ,रहिम सय्यद,चालक आकमार,बकंट लटपटे व त्यांचे सहकारी घटनास्थळी रात्री दाखल झाले. मानवत नगर परिषदची अग्निशामक दलाची गाडीस पाचारण करण्यात आली. अग्निशामक दलाचे सय्यद कलीम,मुकेश कुमावत ,देवेंद्र किर्तने यांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळविले.
या प्रकरणी मानवत पोलीस स्टेशन मध्ये आकस्मीत जळीत रजिस्टरला नोद घेण्यात आली असुन अधिक तपास नारायण सोळंके हे करीत आहे.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704