https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानवत येथे सर्व चालक मालक संघटनेच्या वतीने मुख मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले

शेकडो चालक मालक मोर्चात सहभागी

मानवत / प्रतिनिधी.

मानवत येथे आज ०१ जानेवारी रोजी चालक मालक व सर्व संघटनेचा वतीने मुख मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या वेळी राजेश कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाले तहसिल प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की,
केंद्र सरकारने नवीन मोटार वाहन कायद्या आणला असून यात सुधारणा करावी म्हणून सोमवारी सर्वच चालक मालक ड्रायव्हर यांच्या वतीने राजेश कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाले मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले या मूख मोर्चात मानवत तालुक्या तील सर्वच चालक – मालक संघटना सहभागी झाले होते. मूक मोर्चाला परवानगी संघटनेने पोलीस प्रशासनाकडे मागितली असल्याने प्रसासनाने मोर्चास परवानगी दिली आहे. मूख मोर्चा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज कृषि उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड येथून निघुन मुख्यरस्ता मार्गे तहसील कार्यालयावर धडकला या ठिकाणी प्रसासनास निवेदन सदर करण्यात आले. या मूक मोर्चात मानवत तालुक्यातील सर्वच चालक – मालक संघटनेचे पदाधिकारी या वेळी मोठ्या संख्येने सहभागी होवून आपल्य संतप्त भावना सरकार पर्यंत पोहचाव्यात या साठी राजेश कच्छवे यांच्या मार्ग दर्शनाखाले या वेळी तहसिल प्रशासनास निवेदन सादर करण्यात आले या वेळी शेकडो चालक व शेकडो मालक या मोर्चात सहभागी झाले होते.

*

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704