https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

शारीरिक आणि मानसिक आरोय चांगले राहण्यासाठी ओशो मेडिटेशन्सची आवश्यकता आमदार डॉ. राहूल पाटील

मानवत / प्रतिनिधी.
मानवाचे शारीरिक आणि मानसिक आरोय चांगले राहण्यासाठी ओशो मेडिटेशन्स ची खूप आवश्यकता आहे असे प्रतिपादन परभणी मतदार संघाचे लोकप्रिय आमदार डॉ. राहूल पाटील यांनी केले. ते मानवत येथील ओशो सम्यक ध्यान केंद्राचा वतीने आयोजित करण्यात आलेल्या डॉक्टरांसाठी मेडिकेशन टू मेडिटेशन या विषयावर आधारित ध्यान शिबिराचे उदघाट्न करताना बोलत होते. आजच्या जीवन शैली मुळे प्रत्येक जण तनावाखाली वावरत असून त्याचा आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे डॉक्टर्स नी स्वतः तर या ध्यान पद्धतीचा अवलंब करावा तसेच इतरांना देखील ध्यानासाठी प्रवत्त करन्याचे आवाहन अध्यक्षीय समारोप करताना त्यांनी केले.

तसेच त्यांच्या परभणी येथील मेडिकल कॉलेज परिसरात ओशो मेडिटेशन सेंटरसाठी सभाग्रह बांधण्याचे आश्वासन यावेळी त्यानी दिले. कार्यक्रमाचे प्रास्तविक ओशो सम्यक ध्यान केंद्राचे संचालक प्रा. अरविंदजी घारे यांनी केले. औष धोपचाराला जर ओशो मेडिटेशन्सची जोड दिली तर अधिक आरोग्यदायी व आनंदपूर्ण जीवन जगता येईल हे सांगत असतांच त्यांनी मेडिटेशन टू मेडिटेशन ची संकल्पना विस्तापूर्वक समजावून सांगितली. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मानवत येथील प्रसिद्ध व्यापारी जयकुमारजी काला यांनी ओशोच्या जीवनातील अनेक घटनावर प्रकाश टाकला. तर दुसरे वक्ते डॉ. विजय तोशणीवाल यांनी ओशोच्या ध्यान पद्धत्ती सहज सुलभ असून १० ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या या ध्यान शिबिरात जास्तीत जास्त डॉकटर्सनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. तसेच यावेळी प्रसिद्ध विधिज्ञ अ‍ॅड. सुरेशराव बारहाते यांचे समयोचित भाषण झाले. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर मानवत नगरीचे युवा नेते डॉ. अंकुश लाड, बिडचे मेडिकल ऑफिसर डॉ. संतोष गुंजकर, महाराष्ट्र कृषी भूषण सोपानराव अवचार, कृषी अभियां त्रिकी महाविद्यालचे माजी प्राचार्य अशोकजी सोनी, परभणी येथील जेष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. तुळशीरामजी होलंबे, संजीवनी शिक्षण प्रसारक मंडळ परभणीचे सचिव प्रा. गजानन काकडे, संतोष भांबळे मानवत तालुका मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष संजयजी नाईक यांची यावेळी उपस्थिती होती. ध्यान शिबिर कार्यक्रमास शहरातील डॉक्टर्स बंधू, शिक्षक, प्राध्यापक व प्रतिष्ठित नागरिक आणि पत्रकार बांधवाची मोठया संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री. सदाशिव होगे यांनी केले तर आभार प्रदर्शन अ‍ॅड. दत्ता मगर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अ‍ॅड. सतीशराव बारहाते, प्रकाश करपे, बापू कुटे, अ‍ॅड. मोहनजी बारहाते, जयप्रकाश मिटकरी, विनोद केरे यांनी प्रयत्न केले.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704