https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

एम सी आर न्यूज कवयित्री आपल्या भेटीला “नवरा-बायको यांच्यातील संवाद :लैलेशा

*नवरा-बायको यांच्यातील संवाद*
**************************
बायकोने विचारले – ‘यावेळी मला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त गिफ्ट द्याल ना ?’
मी म्हणालो – ‘ लग्नाचा वाढदिवस याच महिन्यात आहे का ?’
झालं… बायको नाराज झाली.
मला समजले नाही शेवटी झाले तरी काय.

बायको म्हणाली -‘ आज आपण बाहेर जेवायचे का ?’
मी जेवणाचा टेबल व्हरांड्यात लावला.
झालं…. बायको नाराज झाली.
माहित नाही काय झालं.


बायको म्हणाली -‘ यंदा उन्हाळ्यात मला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जाल याची खात्री बाळगू का?’
मी म्हणालो -‘ विश्वास ठेवायला हरकत नाही.विश्वासावरच तर सर्व जग चाललंय.’
झालं…. बायको नाराज झाली
मी तर सकारात्मक बोललो होतो.

मी कुठेतरी वाचलं होतं की बायकोच्या हातच्या जेवणाची स्तुती केली तर बायको खुश होते.
मी म्हणालो -‘ तू आज मस्त भाजी बनवली.आज काही वेगळीच चव आहे भाजीची.’
झालं…. बायको नाराज झाली.
(माझ्या मुलीने सांगितलं की आजची भाजी शेजारच्या काकूंनी दिली आहे.)
माझी काय चूक यात.मी काय अंतर्यामी आहे का?

मी वजन करणारी डिजिटल मशीन घेऊन आलो जिच्या इंस्ट्रक्शन बुकलेटमध्ये लिहिले होते-‘ step on it gently, otherwise the glass may break.’
जेव्हा माझी बायको वजन करायला डिजिटल मशीनवर चढायला लागली तेव्हा मी तिला सावधान केले: आरामात चढ नाहीतर मशीन तुटेल.’
झालं…. बायको नाराज झाली
आता सावधान करणे पण चुकीचे आहे का?

बायको एकदा सराफा बाजारात म्हणाली -‘ गळ्यासाठी काहीतरी द्या ना मला.’
मी विक्सच्या दोन गोळ्या दिल्या तिला.
झालं…. बायको नाराज झाली.
मला तर अजूनही कळलं नाही की बायको माझ्यावर नाराज का आहे?माझी काय चूक झाली?
**************************
लैलेशा भुरे
नागपूर

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704