स्कूल बसने घेतला बालिकेचा जीव.खरब्यावर शोक कळा.

*mcr news Anil Chavan.*
*—————————————*
मानवत तालूक्यातील मानवत रोड येथील जिजाऊ ज्ञान तिर्थ विद्यालयाच्या स्कूल बसने मौजे खरबा येथील *शिवज्ञा दत्ता निर्मळ* या बालिकेचा पूढील चाकात आल्याने अपघात झाला त्यामध्ये तीला जीव गमवावा लागला. अपघाताची माहीती वार्यासारखी गावा सह तालूक्यात पसरल्यामूळे सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात असून खरबा या गावावर शोककळा पसरली.
नेहमी प्रमाणे *शिवज्ञा* वय वर्षे 3 ही आपल्या भावाला जिजाऊ ज्ञानतिर्थ च्या स्कूलबस मधे सोडण्यास आली. चालका सोबत वाहक नसल्यामूळे तील गाडीच्या पूढच्या टायर खाली गेली चालकाचे लक्ष्य नसल्याने आणि जिजाऊ ज्ञान तीर्थ विघालय प्रशासनाची निष्काळजी पणा असल्यामूळे या गाड्या फक्त चालक आहे पण वाहक नाही त्यामूळे ही घटना घडली असल्याचे मत गावकरी व्यक्त करीत आहे. आज घडलेल्या घटनेमूळे शिक्षण विभाग काही बोध घेईल का ? असा प्रश्न सुज्ञ शिक्षणप्रेमी नागरिक व्यक्त करीत आहे. भंगारात निघालेल्या स्कूल बस तालूक्यासह शहरात धावत असल्यामूळे नागरिकांतून चिंता व्यक्त केल्या जात आहे. तर या घटनेमूळे खरबा ग्रामस्थावर दुःखच संकष्ट कोसळले आहे.
*