https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

परभणी जी.एस.टी (G.S.T.) कार्यालयास *सौ.रामकंवर द्वारकादास लड्डा विद्यालयांच्या विद्यार्थ्यांची क्षेत्र भेट

मानवत // प्रतिनिधी.

मानवत येथील सौ, रामकंवर द्वारकादास लड्डा विद्यालयातील विद्यार्थ्यांना गणित विषयाच्या अंतर्गत क्षेत्र भेटीचे आयोजन दिनांक २३ आॅक्टोबर रोजी करण्यात आले होते या क्षेत्र भेटीत विद्यार्थ्यांना जी.एस.टी (G.S.T.) कार्यालय परभणी येथे नेण्यात आले.
परभणी येथील जी.एस.टी कार्यालया मधील सर्व कर्मचाऱ्यांचे कामकाज कसे चालते या विषयी या वेळी विद्यार्थ्यांनी सविस्तर पणे माहिती जाणून घेतली. या वेळी विद्यार्थ्यांच्या मनात आलेल्या शंका या विषयी विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न विचारून आपल्या प्रश्नांच्या , शंखांचे निरसन करून घेतले या वेळी जी.एस.टी कार्यालयाचे आयुक्त श्री धनंजय देशमुख ,आशा गमे मॅडम आणि जान्हवी शेंबाळे मॅडम, व कामाजी तोटेवाड सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना अतिशय सविस्तर पणे विद्यार्थ्यांना माहिती सहज समजेल अशा सोप्या भाषे मध्ये सविस्तर पणे माहिती समजावून सांगितली या क्षेत्र भेटीसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विश्वभूषण इंगोले सर हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
या प्रसंगी आयुक्त देशमूख साहेबांना पुस्तक रुपी ग्रंथ भेट देऊन विद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. या क्षेत्र भेटीचे आयोजन विद्यालयातील गणित विषयाच्या तज्ञ शिक्षिका श्रीमती कांचन सावंत सहशिक्षक यांनी केले होते.

.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704