https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

जिल्हा मध्यवर्ती बँक संचालकांनी कुटूंबातील सदस्यांच्या नावावर कर्ज दिल्या प्रकरणी चौकशी करुन सबंधितावर कारवाई करा

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालुक्यातील मौ. मंगरूळ बु. येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक यांनी कुटूंबातील सदस्यांच्या नावावर कर्ज दिल्या प्रकरणी चौकशी करुन सबंधितावर कारवाई करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने २४ जुलै रोजी मानवत तहसीलचे तहसिलदार यांच्याकडे एका निवेदना द्वारे केली आहे.
यावेळी दिलेल्या निवेदनात नमूद कारण्यात आले आहे की, मंगरूळ बु. येथील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेने बँकेचे कर्ज बाकी असताना सुद्धा सदरील बँक संचालकांनी स्वतःचा कुटूंबाचा नावाने लाखो रुपयाचे कर्ज मंजुर करुन दिले आहे.
त्यामुळे तालुक्यातील इतर शेतकऱ्यांना कर्ज मिळाले नाही व चालू बाकी शेतकऱ्यांचे कर्जाची रक्कम भरून घेतले परंतु त्यांनाही पिक कर्ज दिलेले नाही तरी शेतकऱ्यांना पिक कर्ज देण्यात यावे व प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबंधिताचे सर्व सभासदांचे बेबाकी प्रमाणपत्र पुराव्यानिशी सादर करण्यात यावे आणि संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने १२ ऑगस्ट पासून अमरण उपोषण करण्यात येईल.
असा ईशारा या वेळी निवेदनाद्वारे दिला असून दिलेल्या निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मानवत तालुका अध्यक्ष विठ्ठलराव चौखट, पक्ष तालुकाध्यक्ष नामदेवराव काळे पाटील, युवा तालूका. अध्यक्ष दत्ताराव परांडे, शिवाजीराव चौखट, श्रीकांत (भैया) डासाळकर, संजय चौखट, सूरज चौखट, तुकाराम मसलकर, युवा नेते अशोकराव काळे, यांच्या सह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704