https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
आरोग्य व शिक्षण

शिक्षणाधिकारी (माध्य) गैरहजर…. कार्यालय रिकामे

चंद्रपूर,प्रतिनिधी :-

शिक्षणाधिकारी (माध्य) कार्यालयाला घेराव आंदोलन करण्याकरीता जिल्हयातील शिक्षक-शिक्षिका मोठया संख्येने जि. प. चंद्रपूरच्या आवारात एकत्र आले परंतू वर्धा येथे झालेल्या घेराव आंदोलनाचा धसका घेवून शिक्षणाधिकारी (माध्य) कल्पना चव्हान या कार्यालयात उपस्थित नव्हत्या तर उपशिक्षणाधिकारी आणि शिक्षण विस्तार अधिकारी हे कार्यालयीन कामासाठी बाहेर गेले होते. या पार्श्वभूमीवर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी मोठया संख्येने उपस्थित पदाधिकारी, शिक्षक, शिक्षिका यांच्या उपस्थितीत अधिक्षक यांना घेराव करण्यात आला.

वरिष्ठ  व निवड श्रेणी 12/24 वर्ष पूर्ण  झाल्याच्या दिनांकापासून मंजूर करावी या प्रमुख मागणीला घेवून व प्राध्यापक शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या  इतरही महत्वपूर्ण प्रश्नाला वाचा फोडून ते प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याच्या दृष्टीने  विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह  सुधाकर अडबाले यांनी यापूर्वी कार्यालयाला व प्रसिध्दीला दिलेल्या पत्रानुसार 21 नोव्हेंबर 2022 ला दुपारी 4ः30 वाजता  शिक्षणाधिकारी (माध्य) कार्यालयाला घेराव आंदोलन करण्याकरीता जिल्हयातील शिक्षक-शिक्षिका मोठया संख्येने जि. प. चंद्रपूरच्या आवारात एकत्र आले परंतू वर्धा येथे झालेल्या घेराव आंदोलनाचा धसका घेवून शिक्षणाधिकारी (माध्य) कल्पना चव्हान या कार्यालयात उपस्थित नव्हत्या तर उपशिक्षणाधिकारी आणि शिक्षण विस्तार अधिकारी हे कार्यालयीन कामासाठी बाहेर गेले होते. या पार्श्वभूमीवर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी मोठया संख्येने उपस्थित पदाधिकारी, शिक्षक, शिक्षिका यांच्या उपस्थितीत अधिक्षक बेलेलवार यांना घेराव करण्यात आला.

        वर्धा येथे विमाशिने सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात केलेल्या आंदोलनात वर्धा शिक्षणाधिकारी (माध्य) यांनी वरिष्ठ व निवड श्रेणी 12 व 24 वर्ष पुर्ण झाल्याच्या दिनांकापासून मंजूर करावी यासाठी शिक्षण संचालक, पुणे यांच्याकडून मार्गदर्शन मागविण्याचे ठरवले त्यानुसार कार्य करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. चंद्रपूर येथील कार्यालयात शिक्षणाधिकारी उपस्थित नसल्यामुळे अधिक्षकांनी दिलेल्या आष्वासनामुळे सदर आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगीत करण्यात आले.

        आजच्या या आंदोलनामुळे वरिष्ठ व निवड श्रेणी लागु करणे या प्रमुख मुद्दया बरोबरच सेवानिवृती प्रस्ताव, ग्रॅज्युएटी, लिपीक पदावरील समायोजित प्रकरणे, मंडळ मान्यता वर्धीत करणे, प्रलंबित शालार्थ आय.डी. प्रस्ताव, अनुकंपा नियुक्ती मान्यता प्रस्ताव आदी विषयावर चर्चा करण्यात आली. हे प्रश्न सुटले नाहीत तर लवकरच या कार्यालयाला घेराव करून जोपर्यंत सर्व प्रश्न पुर्णपणे सुटत नाहीत तो पर्यंत कार्यालय न सोडणे अशा प्रकारचे आंदोलन भविष्यात  विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ करेल व कोणत्याही परिस्थितीत हे प्रश्न सोडविले जातील असे आष्वासन उपस्थित शिक्षक बंधू, भगिनींना  सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना दिले.

        या घेराव आंदोलनाला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले, महामंडळ सहकार्यवाह जगदिश जुनगरी, जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे, जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे, कार्याध्यक्ष लक्ष्मणराव धोबे, सहकार्यवाह अनिल कंठीवार, प्रसिध्दी प्रमुख प्रभाकर पारखी, कोशाध्यक्ष दिगांबर कुरेकार, प्रा. ज्ञानेश्वर सोनकुसरे, दिपक धोपटे (जि.प्र.), विलास घोनमोडे, प्रशांत धाबेकर, विठ्ठल चिंचोलकर, डाॅ. विजय हेलवटे (माजी मुख्याध्यापक), मोहन गंधारे (माजी मुख्याध्यापक), मंगेश माडूरवार, आशिष  पिंपळशेंडे, लोकेश फुलझेले, गुलाब खामनकर, नितीन टोंगे, प्रकाश जांभुळकर, सौ. मंजुषा धाईत, गोंविंदा आदे, संजय अंड्रस्कर, प्रभाकर मत्ते, विजय पत्तीवार, रंजना पडवेकर, इंदीरा मत्ते, सौ. कविता अनंतवार, वैशाली पोडे, स्मिता मत्ते,  जया पालीवाल, सौ मिना बोबडे, कु. प्रणिता मुप्पावार, जयंत टोंगे, प्रभाकर ढवस, प्रशांत झाडे, अमोल भोंगळे, अजय कुरेकार, महेंद्र तुराळे, गजानन पुरी, सौ. जमुना मेश्राम, मंजीरी जवादे, नंदा मुप्पीडवार उपस्थित होते.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704