https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
आपला जिल्हा

ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी 17 ऑक्टोंबर ऐवजी 18 ऑक्टोंबर रोजी

गडचिरोली,प्रतिनिधी :-

सचिव राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र, मुंबई यांचे दि.07 सप्टेंबर 2022 रोजीच्या आदेशान्वये माहे जानेवारी 2021 ते मे 2022 या कालावधीत मुदत संपलेल्या व जून 2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणूकांसाठी संगणक प्रणालीद्वारे राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम  देण्यात आला आहे.

मा.सहाय्यक आयुक्त, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र, मुंबई, दिनांक 04 ऑक्टोंबर, 2022 गडचिरोली जिल्हयातील ग्रामपंचायत निवडणूकीकरीता मतमोजणी दिनांक 17 ऑक्टोंबर 2022 ऐवजी 18 ऑक्टोंबर, 2022 अशा निश्चित करण्यात येत आहे. आणि मा.जिल्हाधिकारी, गडचिरोली यांचे आदेश दिनांक 12 ऑक्टोंबर, 2022 अन्वये मतमोजणीची ठिकाण व वेळ पुढील प्रमाणे निश्चित करुन दिलेली आहे. याबाबत शुध्दीपत्रक काढण्यात येत आहे.

मतमोजणीचे ठिकाण-दिनांक व वेळ:-दिनांक, 18ऑक्टोंबर 2022 वेळ सकाळी 10.00 वाजता तहसिल कार्यालय, अहेरी येथे मतमोजणी होणार आहे.असे तालुका निवडणूक अधिकारी, तथा तहसिलदार, अहेरी यांनी कळविले आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704