इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा नांदेडच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन

नांदेड: (डॉ.प्रवीणकुमार सेलूकर)इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा नांदेडच्या वतीने आज होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या नोंदणीचा निर्णय हा अन्यायकारक आणि धोकादायक असल्याकारणाने याचा विरोध करत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले महाराष्ट्र शासनाने 15 जुलै 2025 पासून एक आदेश लागू करत ज्या होमिओपॅथी डॉक्टरांनी थर्माकोलॉजी या विषयात एक वर्षाचा ब्रिज कोर्स केला आहे अशा डॉक्टरांची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या स्वतंत्र राष्ट्रांमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय अत्यंत धोकादायक असून जनतेच्या आरोग्याशी खेळ करणारा आहे असे इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटले आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनने महाराष्ट्र शासनाच्या संभाव्य निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्र उच्च न्यायालयात याचे दाखल केली होती सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ असून अंतिम निर्णय आणून आलेला नसताना सुद्धा शासनाने 15 जुलै 2025 पासून अमलात येणारा नवीन आदेश काढणे म्हणजे न्यायालयाचा संभाव्य अवमान होतो इंडियन मेडिकल असोसिएशनचे असे म्हणणे आहे की एमबीबीएस मध्ये प्रशिक्षित डॉक्टर हे संपूर्णपणे सायंटिफिक व पुराव्या आधारित उपचार पद्धती शिकतात तर बीएचएमएस डॉक्टरांचे शिक्षण हे पूर्णतः होमिओपॅथीवर आधारित असते आणि त्यांना आधुनिक औषधे सर्जरी आपत्कालीन वैद्य व्यवस्थापनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण मिळत नाही त्याचप्रमाणे सी सी एम पी हा एक वर्षाचा ब्रिज कोर्स आहे जो होमिओपॅथी डॉक्टर साठी आखण्यात आलेला आहे या कोर्समध्ये अत्यल्प प्रमाणात थर्माकोलॉजी मेडिसिन याचे प्राथमिक ज्ञान दिले जाते हा कोर्स कोणत्या प्रकारे एमबीबीएसच्या सरासरीच्या साडेपाच वर्षाच्या अभ्यासक्रमास तुल्य नाही त्याचप्रमाणे जर अशा डॉक्टरांना आधुनिक मेडिसिन प्रॅक्टिशन म्हणून मान्यता दिली गेली तर सामान्य रुग्ण गोंधळात पडतील आपत्कालीन परिस्थितीत चुकीचे औषध उपचार चूक निदान सर्जिकल अज्ञान यामुळे रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे मान्यताप्राप्त एमबीबीएस डॉक्टरांची प्रतिमा मलीन होण्यास हा निर्णय कारणीभूत ठरतो अशा परिस्थितीमध्ये सरकारने फार निर्णय ताबडतोब मागे घ्यावा अन्यथा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र निषेध आंदोलने करण्यात येतील असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे त्याचबरोबर जनतेला आपण असे आव्हान केले आहे की रुग्णांनी शैक्षणिक आरता व नोंदणी तपासूनच डॉक्टर कडे उपचार घ्यावेत एमबीबीएस एम डी एम एस डी एन बी डॉक्टर कडेच आपत्कालीन व शस्त्रक्रिया संबंधी उपचार घ्यावेत आरोग्य हा तुमचा मूलभूत हक्क आहे तो केवळ संपूर्ण प्रशिक्षित आणि पात्र डॉक्टरकडेच झाला पाहिजे असे आव्हान त्यांनी जनतेस केले आहे.यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा नांदेडचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रल्हाद कोटकर, सचिव डॉ. राहुल लव्हेकर, खजिनदार डॉ. राजेश तगडपले, तसेच डॉ. संजय कदम, डॉ. मारुती डाके, डॉ. प्रदीप बोडके, डॉ. अमर चव्हाण, डॉ. राम बागल, डॉ. जान्हवी वडसकर, डॉ. तेजस हिरास, डॉ. विजय पवार, डॉ. मनीष देशपांडे, डॉ. राजेश कोमवाड, डॉ. अब्बासी, डॉ. कृष्णा जगदंबे, डॉ. अरुण मान्नीकर, डॉ. तोष्णीवाल, डॉ. पटेल आदींची उपस्थिती होती.
2:39 PM✓✓✓✓