नागरजवळा ग्रामपंचायतीच्या वतीने सूरू असलेली विकास कामे प्रगती पथावर.

*MCR NEWS / Anil Chavan*
*————————————————*
मानवत तालूक्यातील नागरजवळा येथे विकास कामांना प्रारंभ झाल्यामूळे मौजे नागरजवळा येथे 90 / 10 अंतर्गत गावामध्ये जवळपास 250 फुट सांडपाणी वाहून नेणारी नाली बांधकाम पूर्ण झाले असून 170 ब्रास चा सीसी रोड विकास कामाचा प्रारंभ विकास पुरुष सुरेश दादा होगे यांच्या नेतृत्वाखाली नागरजवळ्याच्या सरपंच अयोध्या गजानन होगे आणि उपसरपंच नारायण बाबासाहेब होगे यांच्या हस्ते आज दिनांक 18 डिसेंबर रोजी रोड विकास कामाच्या कामास प्रारंभ झाला आहे. यावेळी नागरजवळा ग्रामपंचायतचे सन्माननिय सदस्य आसाराम सोपानराव होगे , देविदास एकनाथराव होगे , मीरा सिद्धेश्वर होगे , सीमा सुरेश होगे, अनिल मनोहर सूर्यवंशी , उषा सुरेश देंडगे , रेणुका शेषराव देंडगे, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत तसेच गावातील ग्रामस्थ बी. के. होगे पाटील, तुकाराम होगे , भागवत होगे , अशोक नायबळ , सिद्धू पाटील , कृष्णा होगे , विजय होगे , मदन होगे , श्री किशन होगे , मान्यवरांच्या उपस्थितीत विकास कामांना प्रारंभ असून मानवत तालुक्यात नागरजवळा गाव आगामी काळात एक विकासाचे आदर्श मॉडेल बनविण्याचा संकल्प विकासपुरुष सुरेश होगे यांनी व्यक्त केला आहे. सन्माननिय ग्राम पंचायत सदस्यांनी या कामास पूर्ण सहकार्य केल्यामुळे रोड व नाली बांधकामामुळे गावकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केल्या जात आहे. नवीन रस्त्यामुळे रहदारीचा अडथळा दूर झाला आहे. तसेच नाली बांधकामामुळे गावाच्या स्वच्छते मध्ये भर पडली आहे. त्यामूळे सुंदर गांव स्वच्छ गांव हि संकल्पना राबविण्यात येत आहे.
***