ताज्या घडामोडी

उद्या “आयास” कादंबरी वर चर्चा आणि लेखकांशी संवाद. .

नांदेड
प्रसिद्ध साहित्यिक डॉ. शंकर विभुते यांच्या “आयास” कादंबरीवर चर्चा आणि त्यांची प्रकट मुलाखत उद्या (२५ डिसेंबर )सकाळी आयोजित करण्यात आली आहे.
बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ बिजूर व ड्रीम फिटनेस स्टुडिओ भाग्यनगर, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने संवाद पुस्तकांशी अन गप्पा लेखकांशी या उपक्रमांतर्गत “आयास” कादंबरीवर चर्चा व “आयास” कादंबरीचे लेखक डॉ. शंकर विभुते यांची प्रकट मुलाखत ड्रीम फिटनेस स्टुडिओ भाग्यनगर, नांदेड येथे आयोजित करण्यात आलेली असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठीतील सुप्रसिद्ध साहित्यिक व समीक्षक डॉ. अनंत राऊत राहणार आहेत.
‘आयास’ कादंबरीची साहित्य वर्तुळात खूप चर्चा झाली. सुप्रसिद्ध समीक्षक डॉ .सूर्यनारायण रणसुभे, डॉ.वासुदेव मुलाटे, डॉ.रवींद्र ठाकूर, देविदास फुलारी, महेश मोरे, डॉ.कमलाकर चव्हाण आदींनी या कादंबरीवर लेखन करून गौरविले आहे.या कादंबरीस राज्यस्तरीय दोन पुरस्कार मिळाले असून महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी प्रकल्प संशोधनासाठी ‘आयास’ कादंबरीची निवड केली आहे. डॉ. शंकर विभुते हे एक कथाकार म्हणूनही साहित्यक्षेत्रात लोकप्रिय आहेत. त्यांच्या एकूण साहित्याची वाटचाल आणि “आयास” कादंबरी समजून घेण्यासाठी या उपक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती कार्यक्रमाचे आयोजक डॉ.भगवान सूर्यवंशी, रेणुका गुप्ता, प्रशांत कऱ्हाळे, डॉ.विजया दाढेल आदिनी केले आहे.वाचन संस्कृती जोपासण्यासाठी आणि बळ देण्यासाठी आयोजित या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.