ताज्या घडामोडी

नांदेड जिल्हा कारागृह नांदेड तर्फे आयुष्यमान भव कार्यक्रमा अंतर्गत रक्तदान शिबीराचे आयोजन


आज दि:-०२ आँक्टोंबर २०२३ सोमवार रोजी सकाळी ११:०० वाजता *राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त नांदेड जिल्हा कारागृह नांदेड तर्फे आयुष्यमान भव कार्यक्रमा अंतर्गत रक्तदान शिबीराचे आयोजन…

आज नांदेडचे जिल्हा शल्यचिकीत्सक डाॅ.निळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डाॅ.संजय पेरके, डाॅ.हांबीरराव साखरे,नांदेड जिल्हा कारागृह अधिक्षक सुभाष सोनवणे* यांनी आयुष्यमान भव या शासनाच्या कार्यक्रमा अंतर्गत राष्ट्रीय उपक्रम म्हणुन रक्तदान शिबीर नांदेड जिल्हा कारागृहात कर्मचारी करीता आयोजित केले,या रक्तदान शिबीरात कारागृहातील तुरूंगअधिकारी दींगाबर रूखमे,कारागृह पोलिस संजय राठोड,सचितानंद जाधव,राहुल बेदडे,कान्हा चव्हाण,अरविंद गायकवाड,गोविंद राठोड,जगदीश काकड, राहुल केसराळे सह एकुण २५ ऐच्छिक कारागृहातील पोलिस कर्मचारी रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक दाईत्व बजावले,या रक्तदान शिबीरात कारागृह अधिक्षक सुभाष सोनवणे व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीत्स डाॅ.संजय पेरके यांनी एका गरजु रूग्णांचा जिव वाचवला ह्या समाधाना सह रक्तदानाचे फायदे रक्तदात्याला कसे आहेत हे सांगीतले व सर्व कर्मचारी यांना मोलाचे मार्गदर्शन करून प्रोत्साहीत केले,हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी कारागृहातील सर्व पोलिस कर्मचारी यांनी या राष्ट्रीय उपक्रम म्हणुन मोलाचे सहकार्य केले.या रक्तदान शिबीरात श्री हजुर साहीब रक्तपेढी नांदेडचे परिवेक्षक प्रविण चव्हाण व पिआरओ प्रदीपकुमार कांबळे, लॅबटेक्निशन सरदार रणज्योतसिंघजी महाराज,साक्षी कांबळे यांनी उत्कृष्ठ रक्तसंकलन केले..

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.