यशस्वीतेसाठी आहार व आरोग्य महत्त्वपूर्ण -प्रा. रुद्रावती चव्हाण

नांदेड:( दि.२३ जानेवारी २०२५)
परीक्षेतील यशासाठी विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास महत्त्वाचा आहे तसेच आहार, विहार व आरोग्याची काळजी घेतल्यास मन व शरीर सुदृढ राहते. तणाव व्यवस्थापनाकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. विशेषतः भरपूर झोप ही उत्तम आरोग्यासाठी आवश्यक आहे, असे प्रतिपादन यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्या प्रा.रुद्रावती एस.चव्हाण यांनी केले.
यशवंत कनिष्ठ महाविद्यालयात ‘परीक्षा काळातील आहार व आरोग्याची काळजी’ या विषयावर कॉपीमुक्त अभियानांतर्गत जनजागृती सप्ताहानिमित्त माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित उद्बोधन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
प्रारंभी प्रास्ताविक प्रा.एस. व्ही. फाजगे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. ओमप्रकाश गुंजकर यांनी केले तसेच आभार देखील मानले. याप्रसंगी विचारमंचावर लेफ्टनंट प्रा.श्रीकांत सोमठाणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.के. आर.रबडे, पर्यवेक्षिका प्रा. व्ही.जी.बदने, प्रा.नरेंद्र कंचटवार आणि डॉ.मुकेश धर्मले यांनी परिश्रम घेतले तसेच उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, प्रबंधक संदीप पाटील, डॉ. अजय गव्हाणे, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील यांनी सहकार्य केले.