https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

राजकूमार हट्टेकर यांच्या मार्गदर्शनाखाले कार्यकारणी जाहिर

मानवत तालुका अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी. श्री. संजय नाईक तर ; उपाध्यक्ष पदी. श्री. प्रा. मोहन बारहाते यांची सर्वानुमते निवड

मानवत / प्रतिनिधी.
मानवत शहरातील शासकीय विश्राम गृहातील दुधना सभागृहात १५ ऑगस्ट रोजी अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाची महत्वाची बैठक जिल्हाध्यक्ष मा. राजकूमारजी हट्टेकर यांच्या मार्गदर्शनाखाले आयोजित करण्यात आली होती.
यावेळी बैठकीत मानवत तालुका अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी. श्री.राणा संजय नाईक तर ; उपाध्यक्ष पदी. श्री. प्रा. मोहन बारहाते व कार्याध्यक्ष पदी. श्री शामभाऊ झाडगावकर यांची सर्वा नुमते निवड करण्यात आली. तर उर्वरित कार्यकारिणीची निवड पुढील प्रमाणे बिन विरोध करण्यात आली यावेळी जिल्हा उपाध्यक्षपदी डॉ. श्री. सचिन चिद्रवार, सचिव पदी प्रसादजी जोशी, कोषाध्यक्षपदी श्री. सचिन मगर, सह सचिव पदी श्री. अनिल चव्हाण यांची निवड करण्यात आली तर यावेळी सल्लागारपदी जेष्ठ पत्रकार तथा संपादक श्री. के. डी वर्मा, जेष्ठ पत्रकार , संपादक श्री. आश्रोबा दादा केदारे, तर सदस्य म्हणून दशरथ शिंदे, प्रविण घागरे, रामभाऊ दहे, रामेश्वर काष्टे, त्रिंबक भिसे, दिगंबर बाकळे, सुरेश कच्छवे यांची निवड करण्यात आली.
बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून परभणी जिल्हाध्यक्ष श्री. राजकुमारजी हट्टेकर, लक्ष्मणराव मानोलीकर, प्रमोदजी अंभोरे, शिवशंकरजी सोनवणे, यांची प्रमूख उपस्थिती होती यावेळी त्यांनी पत्रकाराच्या विविध समस्या यावर मोलाचे असे मार्गदर्शन केले.
या वेळी निवड झालेल्या कार्यकारणीस खूप खूप शुभेच्छा दिल्या यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रसादजी जोशी यांनी केले तर शेवटी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार प्रा. मोहनजी बारहाते यांनी मानले.
या वेळी संपादक गोपाळराव गोलाईत यांनी सर्व पत्रकार बांधवांना पूढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704