https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

सामाजिक उत्तरदायीत्वाची भावना जपा प्रा. डॉ. दिगंबर नेटके

मानवत / प्रतिनिधी.
पदवी प्राप्त केल्यानंतर आपल्या वरील जबाबदारी आणखी वाढली आहे. आपल्या कुटुंबा बरोबरच समाजाप्रती आपले दायित्व आहे याचे सजग भान ठेवून युवकांनी समाजाप्रती असलेले उत्तरदायित्व जपले पाहिजे असे प्रतिपादन स्वा. रा. ती. म.विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे समन्वयक डॉ. दिगंबर नेटके यांनी केले.
सविस्तर वृत्त असे की,
येथील के.के.एम .महाविद्यालयाच्या परीक्षा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पदवी वितरण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, पदवी प्राप्त करण्यात मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण अधिक असणे ही समाधानाची बाब आहे तसेच सामाजिक प्रगतीचे लक्षण आहे. दुसऱ्या बाजूस मोबाईलच्या अती वापरामुळे सामाजिक गुन्ह्यांमध्ये होणारी वाढ , कौटुंबिक विसंवाद कमालीचा चिंताजनक बनत चालला आहे.
या नकारात्मक स्थितीसाठी आजचा युवक जास्त जबाबदार असणे जास्तच वाईट आहे असेही ते म्हणाले.
पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी चांगले आणि वाईट यातील फरक लक्षात घेत, मोबाईलचा कमी वापर करत,आई वडील, शिक्षक आणि समाज यांच्या विषयी कृतज्ञता बाळगत सामाजिक उन्नतीचे काम करावे असा सल्लाही त्यांनी दिला.
अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भास्कर मुंडे यांनी ज्ञान, कौशल्य आणि कर्तव्य भावना यांचा अनुबंध आपल्या ठायी प्रस्थापीत करावा असा प्रेमळ सल्ला विद्यार्थांना दिला.
या वेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या परीक्षा विभागाच्या प्रमुख डॉ शारदा राऊत यांनी केले.एकूण १६५ विद्यार्थ्यांना पदवी वितरण करण्यात आले. या प्रसंगी पाथरी तालूका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. विजयकुमारजी कत्रूवार, परीक्षा विभाग उपकुलसचिव श्री. रवी मोहरीर, सिनियर प्रोग्रामर श्री. विलास साळवे, उपप्राचार्य डॉ. बी एस. गिते, महाविद्यालय विकास समिती सदस्य डॉ. के. बी. पाटोळे, डॉ. के एस. कदम, डॉ. पवन पाटील. रा. से. यो. समन्वयक डॉ. सुनीता कुकडे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ दुर्गेश रवंदे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. किशोर हुगे यांनी केले तर आभार डॉ. संदीप राठोड यांनी मानले.महाविद्यालयातील प्राध्यापक वृदं मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704