https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

एम सी आर न्यूज कवयित्री आपल्या भेटीला:” स्त्री” लैलेशा भुरे

स्त्री
**************************
अंडी,सुरवंट,कोष आणि शेवटी फुलपाखरू असा तुझा प्रवास
घडत असतो .कोषातच तुझं रूपांतर एका सुंदर,रंगीबेरंगी फुलपाखरात झालेलं असतं.तुझ्या रंगीबेरंगी,दुमडलेल्या पंखांमध्ये कोषाला तडा देऊन बाहेर पडण्याची ताकद आहे.तू कोषातून बाहेर पडून नवे जग बघतेस.वेगवेगळ्या फुलांचे रंग टिपून अधिकच देखणी होऊन ते रंग उधळून तुझ्या अस्तित्वाची जाणीव सर्वांना करून देतेस…

.
पण तुझ्यावर ओझं लादलं जातं ते कुटुंबाचं,संस्कारांचं,समाजाचं, संस्कृतीचं. तुला एकप्रकारे जायबंद केलं जातं.जगात भरारी घेण्यास तू तयार असतेस,पण का कोण जाणे तुला कित्येकदा जवाबदारीच्या ओझ्याखाली दबून सारं काही दुस-यांच्या सुखासाठी स्वीकारावं लागतं.फुलपाखरू होऊनही तू सुरवंटाचं आयुष्य मुकाटपणे स्विकारतेस.फुलांचे रंग टिपणे तर सोडच ,तुला तुझ्या अस्तित्वाचा, तुझ्या सुंदर रंगांचाही विसर पडतो…
ऐक ना जरा, तुझ्या पंखात अजूनही ताकद आहे.तुझे पंख अजूनही चमकदार,चटकदार आहेत.तुझ्यावर लादलेलं ओझं कुणाचही असू दे,तू ते झटकून मोकळा श्वास घे.त्या काळ्याकुट्ट कोषातून बाहेर पड.बघ! हे सुंदर जग तुझी वाट पाहत आहे.तुझ्या पंखांना बळ तूच देऊ शकतेस.तूच तुझी सखी हो आणि घे भरारी या जगात.तुला पुढं जायलाच हवं.रंग उधळून आयुष्यात सर्वांना तुझ्या अस्तित्वाची जाणीव करून दे….
**************************.
लैलेशा भुरे🌹
नागपुर

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704