https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

नेसुबो महाविद्यालयात एक दिवशीय कार्यशाळा संपन्न…

नांदेड (डॉक्टर प्रवीण कुमार सेलूकर)

अभिनव भारत शिक्षण संस्था संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र विभाग व बायोजीनोम इंडिया नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मोलेक्युलार बायोलॉजी टेक्निक्स’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्हि. शिवणीकर यांनी भूषवले व या कार्यशाळेचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ. एम. वाय. कुलकर्णी यांची उपस्थिती होती या वेळी मंचावर आयोजन समिती सदस्य डॉ. ए. ए. आतनूरकर, आयोजन समिती सचिव तथा बायोजीनोम इंडिया चे प्रमुख डॉ. महेश महाजन यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक या कार्यशाळेचे संयोजक डॉ. सागर साकळे यांनी केले आपल्या प्रास्ताविकात बोलत असताना कार्यशाळेची पार्श्वभूमी व कार्यशाळेचे फायदे विशद करताना भविष्यात सूक्ष्मजीवशास्त्र या विषयांमध्ये रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील यावर सविस्तर मार्गदर्शन केले. बायोजिनोम इंडियाचे प्रमुख डॉ. महेश महाजन यांनी आपल्या भाषणामध्ये बोलत असताना बायोजिनोम या प्रयोगशाळे विषयी माहिती सांगितली. डॉ. आनंत अतनूरकर यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बायोजिनोम प्रयोगशाळेचे अत्याधुनिक साहित्य उपलब्ध नसल्यामुळे या कार्यशाळेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सहभागी करून अत्याधुनिक साहित्याची माहिती त्यांनी यावेळी विशद केली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. एम. वाय. कुलकर्णी यांनी अशा पद्धतीच्या कार्यशाळेचे आयोजन करणे आज काळाची गरज आहे असे सांगून सहभागी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर शिवणीकर यांनी केला आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलत असताना त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कौशल्य विकासाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे असे सांगून अशा पद्धतीच्या कार्यशाळेच्या आयोजन करून विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक अनुभव देणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने ही कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न झाली अशे जाहीर करून या कार्यशाळेचे मुख्य संयोजक डॉ. सागर साकळे यांचे त्यांनी कौतुक केले. कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केल्यामुळे अभिनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय बालासाहेब पांडे यांनी आयोजकांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पियुषा कुलकर्णी यांनी केले तर आभार वैशाली मोरे यांनी केले. या कार्यशाळेमध्ये सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, संशोधक विद्यार्थी, पदव्युत्तर व पदवीधर विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून सहभाग नोंदवला.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704