https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

वृंदावन पब्लिक स्कूलचा “आनंद – तरंग 2024” उत्साहात साजरा

वृंदावन पब्लिक स्कूलचा “आनंद – तरंग 2024” उत्साहात साजरा

नांदेडः माणिक नगर येथील वृंदावन पब्लिक स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन “आनंद – तरंग” नुकतेच उत्साहात साजरे करण्यात आले.
या स्नेहसंमेलनासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. ज्योती सुधीर शिवणीकर व सौ. अर्चना शेखर भवानकर ( झाडबुके) तसेच शाळेच्या प्राचार्या सौ. अश्विनी आनंद आष्टुरकर उपस्थित होत्या. सर्वप्रथम पाहुण्यांचे स्वागत वृंदावनच्या चिमुकल्यांनी लेझीम व ढोल ताशांच्या गजरात केले. या प्रसंगी सौ. अर्चना भवानकर यांनी उपस्थित पालकांना सकारात्मक पालकत्व या विषयावर खूप छान मार्गदर्शन केले व आजच्या मुलांना पालकांच्या सहवासाची किती गरज आहे हे पटवून दिले.
प्राचार्या सौ. अश्विनी आष्टुरकर यांनी वडिल व मुलीचे नाते यावर ‘ ‘बाबा’ ही कविता सादर केली त्यामुळे सर्व वातावरण भावूक झाले होते.
आनंद तरंगची सुरुवात “देवा श्रीगणेशा” या गाण्याने झाली तर “बजाओ ढोल स्वागत मे मेरे घर राम आये है” या गाण्यात चिमुकल्यांनी धुम केली, यामध्ये प्रभु श्रीराम यांच्या भूमिकेत (गणेश हुंडेकर) , सीतामाता यांच्या भूमिकेत (मनस्वी देशमुख ) आणि लक्ष्मण यांच्या भूमिकेत (युवान जाधव) यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
“इंडियावाले” या गाण्यातून देशभक्तीचा संदेश देण्यात आला तर “सितारों की मैफील मे गुंजेगा तरणा” या गीतावर जल्लोष पूर्ण डान्समध्ये अवघ्या वृंदावनने ठेका धरला होता.
कार्यक्रमाचे बक्षीस वितरण प्रमुख पाहुणे सौ. ज्योती शिवणीकर यांच्या हस्ते करण्यात आले. सौ. मंदाकिनी जोगदंड यांनी शिक्षकांवर आधारीत सुंदर कविता सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रुपाली डकारे व आभार प्रदर्शन सौ. क्रांती ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. रुपाताई देशमुख, सौ. अरुणा चोडेकर, श्री. अनिल देशपांडे, श्री. मयूर जोशी, श्री. व्यंकटेश झामरे आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704