शिव पाणंद चळवळी मुळे शिवार रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला.
सरकारचा निर्णय शेतकर्यांच्या उज्वल भविष्यासाठीच राम दहे पाटील

*mcr news / manawat*
*{ Anil chavan}*
मानवत तालूक्यात शिव पाणंद चळवळ सक्षम पणे अधिकारी वर्ग राबवित असल्यामुळे शेतकर्यांच्या शेत रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून तालूक्यातील एकाही शेतकऱ्याला पुन्हा प्रशासकीय न्यायालयीन संघर्ष करावा लागणार नाही.
यासाठी भक्कम पणे शेतकरी चळवळीच्या पाठिशी उभे राहत आहे. त्यामुळे आता एकाही शेतकऱ्याला शेतर स्त्यासाठी जमिन विकण्याची वेळ येणार नाही. तालूक्यातील *शिव पाणंद चळवळी* च्या माध्यमातून गरजवंत शेत रस्ते खास पिडीत शेतकऱ्यांसाठी सर्व शेतकऱ्यांनी शेत रस्त्यासाठी सुरू केलेली शिव पाणंद शेत रस्ता चळवळ एकजुटीने राज्यभर पोहचली आहे. आणि आज प्रशासकीय न्यायालयलीन संघर्षा सोबत आपण रस्त्यावरची लढाई जिंकत मोठे यश आपल्या सर्वांना चळवळीच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि सरकारच्या सकारात्मक शासन निर्णयांमुळे हे सर्वत्र पहायला मिळत या कामी लोक शाहीचा चौथा स्तंभ भक्कमपणे शेतकर्यांच्या पाठीशी उभा राहीला त्यामुळे हि चळवळ सदैव ऋणी असेल असे मत युवा शेतकरी राम दहे पाटील यांनी व्यक्त केले.
सध्या राज्यभर चळवळीच्या मागणी नुसार राज्य सरकार कडून शेत रसत्यांचे वेगवेगळे सुधारीत शासन निर्णय येत असुन याचा फायदा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना होवुन ग्रामविकासाचा पाया भक्कम होत असून त्यामुळे सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी चळवळ कट्टीबद्ध आहे. शेत रस्ते पिडीत शेतकऱ्यांनी एकत्र येवुन सुरू केलेल्या चळवळीच्या ध्येय धोरणा प्रमाणे शेवटच्या शेतकरी भावाला न्याय देण्यासाठी सातत्य पूर्ण संघर्षाची तयारी ठेवली असुन तालूक्यातील सर्व नागरीकांनी राज्य सरकारच्या उपक्रमांच्या माध्यमातून खऱ्या गरजू शेत रस्ते पिडीत शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सहभागी होवून प्रत्यक्ष अंमल बजावणीसाठी विहित कालावधी मध्ये यशस्वी कार्य पार पाडण्यासाठी तालूक्यातील सर्व शेतकर्यांचे योगदान मोलाचे ठरेल.गाव नकाशावर असणारे/ नसणारे वहिवाटीच्या प्रत्येक रस्त्यांचे पाहणी करून गाव दत्परात नोंद करण्यासाठी प्रत्यक्ष पारदर्शक जनजागृती करून ग्रामसभा घेणे शिवार फेरी काढणे प्रत्येक ग्रामप्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत राहून प्रत्येक रस्ता वाडीवरस्तीवर जावून त्यांची नोंद घ्यावी तो रस्ता न्यायालयीन प्रक्रियेत असला तरी त्यांची नोंद आवश्यक.
बाकी मोजणी झाल्यानंतर हद्द निश्चित करणे दगडी नंबरी रस्ता सपाटीकरण वृक्षलागवड मजबुतीकरण आदी प्रक्रिया पारदर्शक पणे पार पाडू या
असू आवाहन शेतकरी पुत्र राम पंडीतराव दहे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केले.