देश आणि धर्मासाठी श्री गुरु गोविंदसिंघजी यांचे बलिदान- ग्यानी सरदार सरबजीतसिंघ निर्मले

नांदेड(प्रतिनिधी): अभिनव भारत शिक्षण संस्था संचलित, नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ‘श्री गुरु गोविंदसिंघ जी प्रकाश उत्सव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. बालासाहेब पांडे यांची उपस्थिती होती. प्रमुख वक्ते म्हणून ग्यानी सरदार सरबजीतसिंघ निर्मले (मुख्य कथावाचक, हुजुर साहेब नांदेड) यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मा. स्वामी प्रत्यानंदजी महाराज, अभिनव भारत शिक्षण संस्थेचे सहसचिव श्री धनंजय जोशी, सदस्य श्री. गजानन कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एम. वाय. कुलकर्णी, वार्षिक महोत्सव प्रमुख डॉ. जीवन मसुरे, गुरु गोविंदसिंघ महाराज जयंती समिती प्रमुख डॉ. परविंदरकौर महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाची सुरवात प्रतिमा पुजन व दिप प्रज्वलनाने करण्यात आली.
यावेळी सुखजिंदरकौर सुखई, अथर्व रगडे, अमोल लकडे यांनी शबद गायन सादर केले. प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एम. वाय. कुलकर्णी म्हणाले की, श्री. गुरु गोविंदसिंघजी जयंती साजरी करण्याच्या माध्यमातुन सामाजिक सलोखा व एक्याची भावना निर्माण करणे हा उद्देश आहे. या वेळी श्री गुरु गोविंदसिंघ जयंती साजरी करण्याच्या मागील भुमीका मांडत असताना प्रो. डॉ. परविंदरकौर महाजन म्हणाल्या की, गुरु गोविंदसिंघजी यांचे विचार आजघडीला प्रासंगीक आहेत. प्रमुख वक्ते ग्यानी सरदार सरबजीतसिंघ निर्मले (मुख्य कथा वाचक) म्हणाले की, श्री गुरु गोविंदसिंघजी ऐतिहासीक पुरुष होते, ज्यांनी देशाच्या व धर्माच्या हितासाठी तलवार उचलली आणि आयुष्यभर अन्याय, अनिती, अत्याचारा विरुध्द लढा दिला. मा. स्वामी प्रत्यानंद महाराज यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की, कोणत्याही प्रकारचा जातीभेद व धार्मीक भेद न करता देशाच्या सेवेसाठी निस्वार्थ पणे कार्य करावे, देशात एकता कायम टिकुन राहावी असे ते म्हणाले .
अध्यक्षीय समारोपात संस्थेचे अध्यक्ष मा. बालासाहेब पांडे यांनी श्री गुरु गोविंदसिंघजी यांचे सर्वश्रेष्ठ गुरु म्हणून जगात असणारी ओळख अधोरेखीत केली तसेच आपण या पावन भुमीत राहतो याचा अभिमान आहे असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. मनजीतकौर पाटनुरवाले यांनी केले तर आभार प्रा. देविदास येळणे यानी मानले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.