यशवंत ‘मध्ये संगीत विभागात सत्रारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न

नांदेड:(दि.७ ऑगस्ट २०२५)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील संगीत विभागात ‘ संगीत कलेच्या माध्यमातून मिळणाऱ्या व्यवसायाच्या संधी’ या विषयावर स्वरसंगम संगीत विद्यालयाच्या संचालिका व अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळाच्या महामहोपाध्याय पदवी प्राप्त श्रीमती सीता राममोहन राव व डॉ.दिपाली पांडे, संगीत विभागप्रमुख पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय, राणीसावरगाव यांचे विशेष व्याख्यान पार पडले.
माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित व्याख्यानाच्या अध्यक्षपदी उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे उपस्थित होत्या.
सुरुवातीला संगीत विभागातील बी.ए. द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी शारदास्तवन या गीताचे सादरीकरण केले. यामध्ये माधवी मठपती, दुर्गा जगदंबे, नेहा थोरात, उदय जाधव आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
श्रीमती सीता राममोहन राव यांनी, संगीत कलेचा रियाज कसा करावा, राग कसा ऐकावा व तो आत्मसात कसा करावा, याबद्दल सखोल मार्गदर्शन केले तर संगीत कला हे फक्त उपजीविकेचे साधन नसून व्यक्तिमत्व विकासाचे सशक्त माध्यम आहे असे प्रतिपादन डॉ. दिपाली पांडे यांनी केले.
कार्यक्रमामध्ये श्रीमती सीता भाभी यांना अत्यंत मानाची, प्रतिष्ठेची महामहोपाध्याय ही पदवी मिळाल्याबद्दल संगीत विभागाच्या वतीने शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ व सरस्वतीदेवीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.
संगीत विभागप्रमुख डॉ.एस. व्ही. शिंदे यांनी प्रास्ताविक केले तर पाहुण्यांचा परिचय प्रा.संगीता चाटी यांनी करून दिला.
सूत्रसंचालन जुई या विद्यार्थिनीने केले तर आभार नेहा थोरात या विद्यार्थिनीने मानले.
कार्यक्रमास बी.ए प्रथम वर्षाचे संगीत, स्कील संगीत, जेनेरिक इलेक्टिव्ह संगीत, तसेच बी.ए. द्वितीय व तृतीय वर्षाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमात बी.ए.तृतीय शिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ सुद्धा पार पडला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे, डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार, गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, संजय जाधव यांनी परिश्रम घेतले.