एनसीसी वार्षिक प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ

नांदेड:
जवाहर नवोदय विद्यालय शंकर नगर येथे 52 महाराष्ट्र एनसीसी बटालियन नांदेडच्या वार्षिक प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ झाला. शिबिराच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व मार्गदर्शक कॅम्प कमांडर कर्नल के डी रेड्डी होते. याप्रसंगी कॅम्प डेप्युटी कमांडर बी आर ठाकूर व कॅम्प अडज्यूटन्ट लेफ्टनंट श्रीकांत सोमठाणकर फर्स्ट ऑफिसर एस. जे. कदम ,सेकंड ऑफिसर डी. बी. शेटे थर्ड, ऑफिसर कोलते मॅडम सुभेदार राम दुलारे यांच्यासह आर्मीचे इतर अधिकारी उपस्थित होते. या शिबिरात नांदेड, परभणी व हिंगोली या जिल्ह्यातील महाविद्यालयीन व माध्यमिक विद्यालयातील विविध शाळांचे छात्र सैनिक व पाच एनसीसी अधिकारी आणि सैन्य अधिकारी त्यामध्ये सहभागी झालेले आहेत. राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांना एनसीसी ए, बी व सी प्रमाणपत्र करिता सदरील प्रशिक्षण करणे गरजेचे आहे. शिबिरार्थी यांना प्रशिक्षणात ड्रिल,फायरिंग,शस्त्र कवायत, नकाशा अध्ययन, सैन्य प्रशिक्षण, अंबुश, पेट्रोलिंग, आपत्ती व्यवस्थापन व आत्मरक्षा सामाजिक सेवा आदी प्रशिक्षण दहा दिवसीय शिबिरात दिले जाणार आहे. शिबिरार्थी कॅडेट्सना या प्रशिक्षणाचा उपयोग एकता व अनुशासन, बंधुप्रेम,खेळाडू वृत्ती, देशसेवा हे गुण विकसित करण्यासाठी करावेत.
अंगी असलेल्या कलागुणांमध्ये खेळाडू वृत्ती, सांस्कृतिक गुण याविषयी अधिकाधिक परिश्रम करत विविध नियोजित स्पर्धात सहभाग नोंदवावा. शिबिरार्थी विद्यार्थी यांनी या प्रशिक्षणाचा उपयोग करत भारतीय सेना व इतर विविध क्षेत्रात असलेल्या संधीचा उपयोग करण्यासाठी ज्ञान व्यासपीठाचा उपयोग करावा. असे आव्हान कर्नल के डी रेड्डी यांनी केले.
एनसीसीच्या उद्देशानुसार नेतृत्वाचे गुण विकसित होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या नेमणुका विविध पदावर करून, नेतृत्व करण्याची संधी देण्यात आली आहे. यामध्ये कॅम्प सीनियर सार्थक शिंदे,
सुभेदार रामदुलारे, सुभेदार शिवाजी हरंगुळे, नायब सुभेदार राशीद खान, नायब सुभेदार राकेश कुमार, बी एच एम रंजीत सिंग, हवालदार रमेश रावेला, हवालदार सुरेश गायकवाड, हवालदार राहुल सोनकांबळे, हवालदार जितेंद्र,हवालदार सुभाष, हवालदार हरीश, नाईक ब्रिजेश
जी सी आय कू. त्रिप्ती कुमारी व जीसीआय साक्षी कंधारे तसेच कार्यालयीन कर्मचारी
रियाज अन्सारी, सचिन साबळे, काटकर बाबूजी, गिरी, पुरी, पडलवार, आलटे
यासह 449 एनसीसी कॅडेटस सहभागी झाले आहेत.